पुण्यात कॅम्प ते एमजी रोडपर्यंत FDA ची तपासणी मोहीम, स्वच्छतेचे नियम धाब्यावर, आठ हॉटेल्सचे परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाने शहरातील विविध भागांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवत आठ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले आहेत.

Untitled Design   2026 11 22T143828.522

Untitled Design 2026 11 22T143828.522

Licenses of eight hotels in Pune suspended : पुण्यातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने शहरातील विविध भागांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवत आठ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छतता, मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री, अन्नपदार्थांवर बुरशी, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अन्न साठवणुकीच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष अशा गंभीर त्रुटी तपासणीदरम्यान आढळून आल्या आहेत.

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 मधील तरतुदी तसेच स्वच्छतेच्या निर्धारित निकषांचे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. शुक्रवारी कॅम्प आणि एमजी रोड परिसरातील 20 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर आठ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. याशिवाय शनिवारी देखील एफडीएकडून अचानक तपासणी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान खाद्यपदार्थांच्या साठवणुकीतील आणि स्वच्छतेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. मुदतबाह्य लाडू, पेढे, केक, पाव, मिल्क रस्क आणि चटणी असे खाद्यपदार्थ आढळून आले. काही खाद्यपदार्थांवर बुरशी वाढल्याचे देखील निदर्शनास आले. तेलाच्या पॅकेटमध्ये गळती होत असल्याचे, तर खाद्यपदार्थांसोबत साबण आणि तुपाचे डबे यांसारख्या खाद्य आणि अखाद्य वस्तू एकत्र साठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी नोंदवले. संबंधित स्टोअर्समध्ये कीटक नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसल्याचं आढळलं.

अजितदादांचा अपघात, अजितदादांबद्दलची वादग्रस्त वक्तव्ये आणि ‘मफलर मॅन’; सुनील तटकरेंनी सगळ्यांचा समाचार घेतला!

ॲमेझॉनच्या डार्क स्टोअरमध्ये खाद्यपदार्थांचे डबे धुळीने भरलेले आढळले. तसेच कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सॅनिटेशनशी संबंधित आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचे समोर आले. तर बिगबास्केटच्या डार्क स्टोअरमध्ये तुटलेली फरशी, कोल्ड स्टोरेज विभागातील अस्वच्छता आणि खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचे आढळले. याशिवाय बॉम्बे पावच्या पॅकेटवर उत्पादनाची तारीख आणि वापराची अंतिम तारीख नमूद नसल्याची बाबही तपासणीदरम्यान उघड झाली.

या कारवाईत पुणे रेल्वे स्थानकाजवळील मेट्रो रेस्टॉरंट आणि शिवाय कॉर्नर, ईस्ट स्ट्रीटवरील सहाना व्हेज रेस्टॉरंट, कॅम्पमधील ग्रँड दिल्ली दरबार हॉस्पिटॅलिटी, बाबासाहेब चौकातील राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार आणि एमजी रोडवरील द बर्गर बार्न कॅफे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर हडपसरमधील सासणेनगर येथील महादेव फूड्स आणि कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम परिसरातील फिरोज केटरर्स यांचाही कारवाई झालेल्या आस्थापनांमध्ये समावेश आहे.

तपासणीदरम्यान काही ठिकाणी स्वयंपाकघरातील अस्वच्छता, मोठ्या प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव आणि खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याचेही उघड झाले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सहाय्यक आयुक्त अन्न नारायण सरकटे आणि सहआयुक्त अन्न श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगताप यांनी ही तपासणी आणि कारवाई केली. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी परवान्याच्या अटी, स्वच्छतेचे निकष आणि अन्न साठवणुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक असल्याचे FDA कडून स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर परवाने निलंबित किंवा रद्द करण्यासह कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

सिंहगड संस्थेतील कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, कोंढवा-नऱ्हे कॅम्पसमधील कर्मचारी कामावर रुजू

दरम्यान, पुण्यातील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आणि हॉटेल्समधील स्वच्छतेबाबत FDA ने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईनंतर तरी खाद्यपदार्थ विक्रेते स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे गांभीर्याने पालन करणार का, तसेच FDA कडून अशा तपासणी मोहिमा यापुढेही सुरू राहणार का, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

हॉटेलच्या स्वयंपाकघरातील अस्वच्छता, मोठ्या प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. पुणे स्टेशन, कॅम्प, महात्मा गांधी रस्ता, हडपसर आणि कोंढवा परिसरातील 20 हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आठ ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे आढळले. हॉटेल दरबार, राजे चायनीज फास्ट फूड अॅड ज्यूस बार एम. जी. रस्ता येथील ‘द बर्गर बाने कॅफे’, हडपसरमधील ‘महादेव फूड्स’ आणि कोंढवा खुर्दमधील ‘फिरोज केटरर्स’ यांचे परवाने निलंबित करण्यात आले.

Exit mobile version