LPG e-KYC Update: गॅस कनेक्शन (LPG Connection) धारकांसाठी महत्वाची बातमी. गॅस कंपन्यांनी सर्व गॅस कनेक्शनधारकांना 15 ऑगस्टआधी ईकेवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ही ईकेवायसीची प्रक्रिया (LPG e-KYC Update) वेळेत पुर्ण केली नाही, तर ग्राहकांना दुप्पट दराने किंवा घरगुती सिलेंडरऐवजी व्यावसायिक (Commercial) दराने गॅस सिलेंडर खरेदी करावा लागेल. तसेच रिफिल बुकिंगमध्येही अडचणी येऊ शकतात.
स्विगीवरून आता LPG मागवता येणार; काही मिनिटांत होणार होम डिलिव्हरी, करार झाला
या ‘ईकेवायसी’चा उद्देश प्रत्येक गॅस कनेक्शनची पडताळणी करणे, बनावट किंवा अनधिकृत गॅस कनेक्शन थांबवणे, तसेच सरकारी अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणे हा असून सर्व गॅसधारकांना 15 ऑगस्टपर्यंत ईकेवायसी पूर्ण करण्याचे तसेच सर्व गॅस वितरकांना जास्तीत जास्त ग्राहकांची ईकेवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; मुख्यमंत्र्यांच्या काकांना विश्वास
अनेक भागांमध्ये अजूनही मोठ्या संख्येने एलपीजी (LPG) ग्राहकांनी आपली ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे गॅस वितरण कंपन्या आणि एजन्सींकडून ग्राहकांना ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. गॅस कनेक्शनची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी ईकेवायसी प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. काही ठिकाणी गॅस एजन्सींकडून ग्राहकांना फोन कॉल, एसएमएस (SMS) तसेच इतर माध्यमातून संपर्क साधून ईकेवायसी पूर्ण करण्याची सूचना दिली जात आहे.
ईकेवायसी न केल्यास काय परिणाम होऊ शकतो?
काही ग्राहकांना एलपीजी रिफिल बुकिंगशी संबंधित अडचणी येत असल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी ग्राहकांच्या मोबाईलवर रिफिल बुकिंग तात्पुरते थांबवले जाऊ शकते, अशा स्वरूपाचे संदेशही मिळत आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी अडचण टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेत ईकेवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
ईकेवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
ग्राहक खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने ईकेवायसी पूर्ण करू शकता.
✦ जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीला भेट देऊन
✦ संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन सुविधेचा वापर करून
✦ उपलब्ध असल्यास कंपनीच्या मोबाइल अॅपद्वारे प्रक्रिया पूर्ण करून
ईकेवायसी साठी सामान्यतः ग्राहकांकडे खालील गोष्टी आवश्यक असाव्यात
✦ आधार कार्ड
✦ आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
✦ एलपीजी ग्राहक क्रमांक किंवा कनेक्शनची माहिती
✦ आवश्यक ओळखपत्रे
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित माहिती अपडेट केली जाते.
आज श्रावणातील पहिला सोमवार, सुकर्म योग या 6 राशींसाठी नशिबाचे दरवाजे उघडू शकतो
