राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना (CM Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारा लंडनचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. लंडनमध्ये 7 आणि 8 ऑक्टोबर 2026 रोजी GIBC UKच्या वतीनं ‘The City Quantum & AI Summit, London’ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाचं शिष्टमंडळ सहभागी होणार होतं.
या दौऱ्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह उद्योग विभागाच्या शिष्टमंडळाला निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यासंदर्भातील कामकाजाला प्राधान्य देत हा नियोजित दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली.
दुष्काळी पार्श्वभूमीवर लंडनचा नियोजित दौरा रद्द
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारा लंडन इथला नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. GIBC UK यांच्या वतीने लंडन इथे ७ आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘The City Quantum & AI Summit, London’ या परिषदेचे आयोजन…
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2026
