ई-ऑफिसमुळे विधान परिषदेत कामकाजाला वेग; 22 हजार 783 प्रकरणांवर कार्यवाही

Maharashtra Legislative Council E-Office विधान परिषदेत ई-ऑफिस प्रणालीच्या वापरामुळे 22 हजार 783 प्रकरणांवर कार्यवाही झाली.

Maharashtra Legislative Council E-Office

Maharashtra Legislative Council E-Office विधान परिषदेत ई-ऑफिस प्रणालीच्या वापरामुळे 13 जानेवारी ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान 22 हजार 783 प्रकरणांवर कार्यवाही झाली असून, कामकाज अधिक गतिमान झाले आहे.

Maharashtra Legislative Council E-Office: विधान परिषदेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-ऑफीस प्रणालीमुळे तब्बल 22 हजार 783 विषयांवर कार्यवाही झाली आहे. सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या पुढाकारातून सचिवालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना ई-ऑफीस प्रणालीचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर राज्यभरातील नागरिकांशी संबंधित बहुतांश विषय मार्गी लागल्याने विधान परिषदेचे कामकाज गतिमान होऊ लागले आहे.

कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही! ‘मुंबईला धमकी, गणेशोत्सवात आंदोलन का? गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा
शासकीय कामकाजात संगणकाचा वापर करुन शासकीय कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्ताऐवज व माहिती सुरक्षित, त्वरेने व जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी सभापती प्रा. शिंदे यांनी पुढाकार घेतला व सचिवालयातील कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या व नंतर सभापती कार्यालयाकडून वारंवार पाठपुरावाही करण्यात आला. त्यानंतर सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी यांना ई-ऑफीस प्रणालीचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर मागील वर्षीच्या ऑक्टोबरपासून सचिवालयातील सर्व शाखांतर्गत तयार होणार्‍या नवीन फाईल्स ई-ऑफीस प्रणालीद्वारे सादर करण्याच्या सूचना दिल्याने त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.

मोदी, पुतिन, जिनपिंग अन् पेजेशकियन एकाच मंचावर; ब्रिक्समधून भारताच्या ‘स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी’चे दर्शन

सभापती प्रा. शिंदे यांच्या कार्यकाळातील कामकाजाचा आढावा घेताना, जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 या वर्षभराच्या कालावधीतील ई-ऑफीस प्रणालीद्वारे सचिवालयात 1 हजार 612 प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी दि.13 जानेवारी ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत 22 हजार 783 एवढ्या प्रकरणांवर ई-ऑफीस प्रणालीद्वारे कार्यवाही झाली आहे. ही प्रणाली अत्यंत सक्षमपणे विधानभवन येथे सुरू असून त्यामुळे कार्यालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊन मंत्रालयीन स्तरावर संपर्क करणे अधिक सुकर झाले आहे. कामकाजाची हीच गती पुढेही कायम राहावी, अशा सूचनाही सभापती प्रा. शिंदे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

Exit mobile version