जरांगेंची मुंबई आंदोलनाची हाक; अंतरवालीतील बैठकीनंतर मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता

मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत आज महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

12

12

Jarang’s call for Mumbai agitation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत आज महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मुंबईतील आंदोलनाची पुढील रणनीती, मुंबईकडे रवाना होण्याचे नियोजन, आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांची व्यवस्था तसेच सरकारसमोर मांडण्यात येणाऱ्या मागण्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता असून, त्यामुळे अंतरवाली सराटीत आज दिवसभर हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे बैठकीत नेमकी काय भूमिका मांडतात आणि सरकारला कोणता इशारा देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version