live now
जरांगेंची मुंबई आंदोलनाची हाक; अंतरवालीतील बैठकीनंतर मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत आज महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Jarang’s call for Mumbai agitation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत आज महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मुंबईतील आंदोलनाची पुढील रणनीती, मुंबईकडे रवाना होण्याचे नियोजन, आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांची व्यवस्था तसेच सरकारसमोर मांडण्यात येणाऱ्या मागण्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता असून, त्यामुळे अंतरवाली सराटीत आज दिवसभर हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे बैठकीत नेमकी काय भूमिका मांडतात आणि सरकारला कोणता इशारा देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
15 सप्टेंबरला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघणार-मनोज जरांगे
15 सप्टेंबरला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे.
-
पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवायचे नाहीत - जरांगे
फडणवीसांनी मराठ्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नये
पोलिसांनी अडवलं तर ती जबाबदारी फडणवीसांचीच असेल
फडणवीस तास करणार नाहीत
अडवलं तर सरळ चटया टाकून डांबरी रस्त्यावर झोपायचं
-
20 तारखेपर्यंत मुंबईत पोहोचणार
ज्या मराठ्यांना शक्य नाही त्यांनी त्यांच्या गाड्यांतून बाकी मराठ्यांना मुंबईत पोहोचावा
शांततेत आंदोलन करायचं . शांततेचा मार्ग कोणी सोडायचा नाही. कोणी जाळपोळ करायची नाही.
मुंबईला येणार नाही त्यांनी कुटुंबासह तुमच्या भागात आशीर्वाद देण्यास या
-
मुंबईला जायचं फायनल झालं – जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार… मराठा आंदोलकांनी होकार दिल्यानंतर मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल… कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईत जायचंय जिंकून यायचंय…. समाजासाठी लढाई आहे.. कुणाला खुन्नस द्यायची नाही. गाड्या घेऊन निघालो तरी 2- 3 दिवस लागतील इतक्या गाड्या आहत… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
जरांगेंनी मुंबईत दाखल होण्याचा रोडमॅप सांगितला
पहिला मुक्काम बीडमधील पाटोद्यामधून
दुसरा मुक्काम श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्यात
तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसरमध्ये
चौथा मुक्काम खोपोलीमध्ये
त्यानंतर आझाद मैदानावर आमरण उपोषण
सगळ्या मुक्कामासाठी सदरील ठिकाणच्या मराठ्यांनी तयारीला लागण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.
-
आपल्याला मुंबईत जायचंय आणि जिंकून यायचं
एका दिवसात मुंबईत जाऊ शकत नाही, त्यामुळे मुक्काम करत मुंबईला जावं लागणार. लाखो मराठ्यांच्या गाड्या मुंबईत जाणार असल्याची घोषणा.
-
आपल्याला मुंबईत जाऊन जिंकून यायचंय – जरांगे पाटील
आपल्याला मुंबईत जाऊन जिंकून यायचंय…. लढाई आता अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे घरी बसू नका. बैठकीत मुंबईला जाण्याची तारीख, मार्ग सांगणार… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात
मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. या बैठकीत मुंबईला कधी जायचे त्याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कुणबी दाखले त्रुटी दाखवून रद्द केल्यानंतर जरांगे पाटील यांचे गेल्या 15 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. आज ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
वडीगोद्री चौकात पोलिसांकडून बॅरिकेटिंग,छावणीच स्वरूप आल्याचं चित्र
वडीगोद्री चौकात पोलिसांकडून बॅरिकेटिंग करण्यात आली. छावणीच स्वरूप आल्याचं चित्र आहे. वडीगोद्री मधून अंतरवालीकडे जाणाऱ्या वाहणांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी बैठकीसाठी येत असलेल्या वाहनांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी देखील समाज बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन लावण्याचे सांगितलं होतं. राज्यव्यापी बैठक होत असल्याने अंतरवाली मध्ये वाहनांची गर्दी होऊन खोळंबा होऊ नये याकरिता खबरदारी घेण्यात येत आहे. मराठा आंदोलकांच्या गाड्या वडीगोद्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लावण्याचा पोलिसांकडून सूचना करण्यात येत आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात मराठा बांधवांचे रास्ता रोको आंदोलन
धाराशिव जिल्ह्यात संभाजीनगर बार्शी महामार्गावर मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं. रस्त्यावर बैलगाडी आडवी लावून परंडा तालुक्यातील सिरसाव येथे मराठा बांधवांनी संताप व्यक्त केला. ‘आता कुठे जायचं मुंबईला जायचय “म्हणत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पंधरावा दिवस असून मराठा बांधवांनी संताप व्यक्त केला.
-
नागपुरात फडणवीस-बावनकुळे यांच्यात बैठक
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्य पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, हे पाहावे लागेल.