मनोज जरांगेंच्या 12 व्या उपोषणाचा दुसरा दिवस; लाखो मराठ्यांची अंतरवालीत रेलचेल

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत राज्यभरातून मराठा आंदोलकांची गर्दी

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil’s Hunger Strike Enters Day 2: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे सुरू झालेल्या या आंदोलनाला आता चौथे वर्ष सुरू झाले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या चर्चेत तोडगा न निघाल्याने जरांगे यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

जरांगेंच्या उपोषणाआधीच मोठी मागणी; सदावर्तेंचा जोरदार विरोध, आरक्षणावरून पुन्हा संघर्ष

आपल्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात राज्यभरातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनानंतर अंतरवाली सराटीकडे आंदोलकांचा ओघ वाढताना दिसत आहे.

पहाटेपर्यंत आंदोलकांची ये-जा सुरू

उपोषणस्थळी रात्री उशिरापर्यंत आणि पहाटेपर्यंत मराठा समाजातील आंदोलक दाखल होत होते. पहाटे चार वाजेपर्यंत अनेक जण अंतरवाली सराटीत पोहोचल्याची माहिती आहे. काही आंदोलकांनी उपोषणस्थळ आणि आजूबाजूच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी मुक्काम केला आहे.

जरांगे पाटलांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम; मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार

पुढील काही दिवस अंतरवालीतच थांबण्याच्या तयारीत अनेक आंदोलक असल्याचेही दिसून येत आहे. आज रविवार असल्याने राज्याच्या विविध भागांतून आणखी मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवालीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

आंदोलकांसाठी जागा अपुरी; शेतकऱ्याने कपाशीचे पीक काढले

आंदोलनस्थळी वाढणारी गर्दी लक्षात घेता आंदोलकांच्या जेवणासाठी आणि वाहनांच्या पार्किंगसाठी जागेची अडचण निर्माण झाली. ही समस्या लक्षात घेऊन शेतकरी विजय तारख यांनी मदतीचा हात पुढे केला.

मोठी बातमी ! मराठा आंदोलकांकडून थेट मंत्र्यांच्या गाडीचा पाठलाग; सोलापुरात गोंधळ

त्यांनी आपल्या अर्धा एकर क्षेत्रातील कपाशीचे पीक रात्रीतून काढून टाकले. या जागेचा उपयोग आता आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था आणि वाहनांच्या पार्किंगसाठी केला जाणार आहे. काल गर्दी वाढल्यामुळे जागेअभावी आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागला होता.

जरांगेंचा सरकारला इशारा

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेप्रमाणेच भाषा करत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

जरांगेंना पोलिसांची नोटीस; आंदोलन करायचं असेल तर ‘या’ 10 अटींचं पालन करा

दरम्यान, आंदोलन थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीतील आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version