‘मेळावा रद्द करा, नाहीतर उपोषण सोडून परभणीत येईन’; संजय जाधवांना जरांगेंनी खडसावलं!

मनोज जरांगे पाटील यांचा खासदार संजय जाधव यांना फोनवरुन चांगलेच झापले एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीतील शेतकरी मेळावा रद्द करण्याची मागणी केली.

Manoj Jarange Warns Sanjay Jadhav

Manoj Jarange Warns Sanjay Jadhav

Manoj Jarange Warns Sanjay Jadhav: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शेतकरी मेळावा तात्काळ रद्द करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. याच मागणीसाठी त्यांनी परभणीचे खासदार संजय जाधव यांना फोन करून आपली भूमिका स्पष्ट केली.

‘कार्यक्रम रद्द करा, नाहीतर उपोषण सोडून येईन’

जरांगे पाटील यांनी संजय जाधव यांच्याशी फोनवरून बोलताना शेतकरी मेळावा रद्द करण्याची मागणी केली. हा कार्यक्रम झाला तर आपण उपोषण सोडून थेट परभणीत दाखल होऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रमाणपत्र रद्द करून मराठ्यांच्या उरावर नाचण्याचं काम केलं जातंय, मनोज जरांगेची सरकारवर घणाघाती टीका

“तो कार्यक्रम रद्द करा, नाहीतर मी उपोषण सोडून लगेच तिथे येईन. तुम्हाला समाज महत्त्वाचा आहे, नेता महत्त्वाचा नाही,” अशा शब्दात जरांगेंनी खासदार संजय जाधवांना खडसावले.

चार कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा उपस्थित

यावेळी जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “एकनाथ शिंदे साहेबांना सांगा, संजय शिरसाट यांनी रद्द केलेली चार कुणबी प्रमाणपत्रे दिल्यानंतरच तो कार्यक्रम होऊ द्या,” अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, “आता एकनाथ शिंदे परभणीत आले, तर मी उपोषण बंद करून परभणीत येईन,” असा इशाराही जरांगे यांनी दिला.

‘फोन उचलला नाही तर मराठे परभणीत आलेच समजा’

आपण पुन्हा फोन करणार असल्याचे सांगत जरांगे यांनी खासदार जाधवांना फोन उचलण्यासही बजावले. “मी पुन्हा फोन केल्यावर फोन उचला. फोन उचलला नाही तर मराठे परभणीत आलेच म्हणून समजा,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

मनोज जरांगेंच्या 12 व्या उपोषणाचा दुसरा दिवस; लाखो मराठ्यांची अंतरवालीत रेलचेल

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे परभणीतील शेतकरी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे. अंतरवाली सराटी येथील त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version