क्लिपमागचं सत्य शोधून दाखवा, ऑडिओ बॉम्बवरून मनोज जरांगेंचं फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज

आता याच मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे.

Untitled Design   2026 10 25T145746.001

Untitled Design 2026 10 25T145746.001

Manoj Jarange’s open challenge to Fadnavis and Shinde : मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या क्लिपवरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. रामदास कदम यांनी भाजप नेत्यांवर टीका केली, तर भाजपकडून देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यांनतर दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी संयमाची भूमिका घेण्याचा सल्ला दिल्याने आरोप-प्रत्यारोप काहीसे शांत झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता याच मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे. कथित ऑडिओ क्लिपमागचं सत्य शोधून जनतेसमोर आणा, असं आव्हान जरांगे यांनी दिलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला आणि आता या कथित ऑडिओ क्लिपवरून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. मात्र, हे आरोप-प्रत्यारोप थांबले तर या प्रकरणातील सत्य समोर येण्याऐवजी वेगळ्याच चर्चांना वाव मिळेल, असा दावा त्यांनी केला.

जरांगे यांनी पुढे म्हटलं की, मराठा समाजातील लोकांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम केलं, त्यांना मतदान देखील केलं. त्यामुळे मराठा आंदोलन मोडण्याचा प्रयत्न कोणी केला, याचा शोध घेणं आणि सत्य जनतेसमोर आणणं ही त्यांची जबाबदारी आहे. आंदोलन चिरडण्याचा कथित प्रयत्नांमागचं सत्य उघड करण्याऐवजी संबंधितांना वाचवलं जात असेल, तर समाजाच्या मनात संशय निर्माण होणार नाही का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर FDA ॲक्शन मोडमध्ये, भेसळखोरांविरोधात राज्यभर फेस्टिव्ह क्रॅकडाउन

या प्रकरणात पडद्यामागे पुन्हा काही हालचाली सुरू असल्याची शक्यता जरांगे यांनी व्यक्त केली. मात्र, ठोस पुरावे समोर आल्यानंतरच आपण अधिक बोलू, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. या कथित ऑडिओ क्लिपमुळे संबंधित नेत्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं. दरम्यान, या प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी फडणवीस यांनी एसआयटीच्या माध्यमातून फॉरेन्सिक तपासाकडे लक्ष द्यावं, अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांनी देखील या तपासाकडे लक्ष द्यावं, असं ते म्हणाले. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे, अशी भूमिका मांडत या कथित ऑडिओ क्लिपमागचं सत्य निष्पक्षपणे बाहेर आणण्याची मागणी त्यांनी केली.

सत्य काय आहे, हे जनतेसमोर आलंच पाहिजे. ते खरं ठरवायचं की खोटं, यापेक्षा सत्य शोधणं महत्वाचं आहे. मी पुरावे समोर आल्यानंतर बोलेन, पण सत्य समाजासमोर आणण्याची भूमिका कायम ठेवणार, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला. या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता आणि त्यातील डाव्यांची स्वतंत्र पुष्टी होणं महत्वाचं असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आव्हानांवर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version