Download App

प्रतिक्षा संपली! ‘MHT CET’ निकाल जाहीर, ‘या’ लिंकवर जाऊ पाहता येणार निकाल

आज महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन हा रिझल्ट पाहता येणार आहे.

  • Written By: Last Updated:

MHT CET Result 2024 : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल (MHT CET)परीक्षा 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आलाय. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ही परीक्षा दिली आहे ते अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

पोर्टलवर सर्व माहिती भरावी लागणार इव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? निवडणूक आयोगाच्या खुलाशाने अनेकांना तोंडावर आपटले

विद्याथ्यांना त्यांचं ओळखपत्रं वापरून निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोअर कार्ड पाहण्यासाठी रोल नंबर, हॉल तिकीट क्रमांक आणि जन्मतारीख यांसारखी माहिती द्यावी लागेल. पोर्टलवर ही सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्याची प्रिंट काढा आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा. दरम्यान, वेबसाईटवर तांत्रिक अडचण आल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास अडचण येत आहे अशीही माहिती आहे.

एमएचटी-सीईटी

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा बहूप्रतीक्षेत असलेल्या या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. याआधी परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या संभाव्या तारखेनुसार हा निकाल १९ जून रोजी जाहीर होणार होता.

7 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी Rahul Gandhi:ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स; राहुल गांधींचं ट्वीट, वायकरांच्या बातमीचं जोडलं कात्रण

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. या अंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) परीक्षेसाठी तब्बल सात लाख २५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

follow us

संबंधित बातम्या