मान्सूनचा जोरदार कमबॅक, 19 राज्यांवर पावसाचं संकट; महाराष्ट्रालाही इशारा

Rain Update : मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने 19 राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

News Photo   2026 09 26T183142.687

Rain Update

मान्सूनच्या लांबलेल्या विश्रांतीनंतर देशातील (Rain) काही भागांत पुन्हा पावसाची सक्रियता वाढली आहे. 27 सप्टेंबरला उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबसह अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसण्याची शक्यता आहे. मात्र, 27 सप्टेंबरसाठी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाचा इशारा नसून, त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाड्यासाठी 27 सप्टेंबरला कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.

ब्रेकिंग- राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

उत्तर भारतातील अनेक भागांत 27 सप्टेंबरला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा इशारा कायम आहे, तर पश्चिम उत्तर प्रदेशात अतिमुसळधार आणि हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे डोंगराळ आणि सखल भागातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, पावसाच्या या बदलामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी सर्वच भागांत पावसाची स्थिती सारखी राहणार नाही. त्यामुळे पावसाचा अंदाज आणि स्थानिक हवामान विभागाच्या सूचनांनुसार नागरिकांनी नियोजन करण्याची गरज आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार 27 सप्टेंबरनंतर महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता आहे.

Exit mobile version