राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. यानंतर रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या असं आवाहन त्यांनी केलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मागून येणाऱ्या एका गाडीने सुळे यांच्या कारला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने गाडीतील प्रवासी सुखरूप आहेत. दरम्यान, घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत कटू अनुभव आला. वाहन क्रमांक GJ 13 CF 5257 ने माझ्या गाडीला बाजूने जोरदार धडक दिली. सुदैवाने, सर्वजण सुखरूप आहेत.
काळजी घेण्याचं आवाहन
अशा प्रकारच्या घटना ही एक गंभीर आठवण करून देतात की, आपल्या रस्त्यांवर अतिवेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणा करणे यामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना आवाहन करतो की, कृपया सीट बेल्ट वापरा, सावध राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा; जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित बनतील.
While travelling from Pune to Mumbai today, I had an awful experience on the highway when vehicle GJ13CF5257 rammed into my car from the side due to reckless driving. Thankfully, everyone is safe.
Incidents like these are a serious reminder that overspeeding and negligence on… pic.twitter.com/WrOGsNzqLX
— Supriya Sule (@supriya_sule) May 9, 2026
