MPSC Secretary Mahendra Harpalkar: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदावर कार्यरत असलेले महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती मुदत पूर्ण होण्याआधीच संपुष्टात आणण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 1 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भात शासन आदेश जारी केला आहे. त्यामुळे MPSC च्या सचिवपदावर आता प्रशासकीय बदल होणार आहे.
‘बँकेत पैसे ठेवलेत? ताबडतोब काढून घ्या’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर इशारा, म्हणाले- ‘बँका बुडणार’
महेंद्र हरपाळकर यांची यापूर्वी MPSC च्या सचिवपदावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता शासनाने ही प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘प्रशासकीय कारणास्तव’ हा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, नेमकं कोणतं प्रशासकीय कारण आहे, याचा तपशील शासन आदेशात देण्यात आलेला नाही.
शासनाच्या आदेशानुसार, हरपाळकर यांनी MPSC चे अध्यक्ष यांच्या संमतीने आपल्या सचिवपदाचा कार्यभार तात्काळ अन्य अधिकाऱ्याकडे सोपवायचा आहे. त्यामुळे सचिवपदाची जबाबदारी आता दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिली जाणार आहे.
पुढील पदस्थापनेचा आदेश स्वतंत्रपणे
महेंद्र हरपाळकर यांची पुढील पदस्थापना कुठे केली जाणार, याबाबतचा निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यांच्या पुढील पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शासनाने जारी केलेला आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन आदेशाचा संगणक संकेतांक 202610021249399707 असा आहे.
