‘दोन पुरुषांसोबत तरुणीला पकडलं अन् मारहाण केली’; पूर्णेकर हत्येप्रकरणी मुलाच्या पुरवणी जबाबातून संशयाचा नवा धागा
Pradeep Purnekar Murder Case; ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुलगा राम पूर्णेकर यांनी पुरवणी जबाबातून एका तरुणीवर संशय व्यक्त केला.
Pradeep Purnekar Murder Case: ठाण्यातील मनपाडा, मनोरमा नगरचे ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradip Purnekar) यांची मंगळावारी (29 सप्टेंबर) त्यांच्याच ऑफीसमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर पुर्णेकरांचे राजकीय विरोधक शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर पुर्णेकर कुटुंबाने गंभीर आरोप केलेत. हे दोघे प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येचे मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप प्रदीप पुर्णेकरांचे सुपुत्र राम पुर्णेकर यांनी केला.
‘आज माझं खुश आहे मन, कारण ठाकरे बंधू करताहेत आंदोलन’; रामदास आठवलेंचा ठाकरे बंधूंना टोला
शिवाय राम पुर्णेकरांनी पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात आणखी एका संशयीतावर आरोप केला. प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येच्या काही दिवसांआधी परिसरातील एका तरुणीला दोन पुरुषांसोबत एका रुममध्ये प्रदीप पुर्णेकरांनी पकडले होते. त्यानंतर त्यांनी त्या दोन पुरुषांना मारहाण केली व त्यांना कापूरबावडी पोलीस ठाण्यात आणले, असं पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात राम पुर्णेकरांनी म्हटलं आहे. तसेच पुर्णेकरांच्या हत्येआधी ती तरुणी प्रदीप पुर्णेकरांच्या ऑफीसबाहेर वावरताना दिसली. यामुळे प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येचा संशय त्या तरुणीवरही आहे. त्यामुळे तिचीही चौकशी करावी, असं राम पुर्णेकरांनी पुरवणी जबाबात म्हटले आहे.
जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट! आपचे नेते सौरभ भारद्वाज ताब्यात
याच मुद्याला धरुन मिनाक्षी शिंदे यांनी स्वतःची बाजू लावून धरली. राम पुर्णेकरांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात संशयीत तरुणीचा उल्लेख केला. त्या तरुणीनेच ‘तुम्हाला बघून घेईन, मारुन टाकेन’, अशी धमकी पुर्णेकरांना दिली होती. त्यामुळे आमच्यावर आरोप लावणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.