मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात; पिंपरी-चिंचवडमधील तरुण नेत्याचा मृत्यू

Missing Link Accident मिसिंग लिंक बोगद्यात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील तरुण नेते तुषार भूमकर यांचा दुर्दैवी मृत्यू

Missing Link Tunnel Accident

Missing Link Tunnel Accident

Missing Link Tunnel Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील(Mumbai-Pune Expressway) मिसिंग लिंक बोगद्यात (Missing Link Tunnel) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील तरुण नेते तुषार भूमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य तिघे जण सुदैवाने बचावले आहेत. अपघात इतका भीषण होता की, फॉर्च्युनर आणि मालवाहू टेम्पो या दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Spider-Man: Brand New Day ची भारतात 400 कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंक बोगद्यात घडला. पुण्याहून मुंबईकडे जाणारी फॉर्च्युनर भरधाव वेगात असताना तिने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, बोगद्यातील एका लेनमध्ये आधीच एक वाहन बंद पडल्याने रस्ता अरुंद झाला होता. ज्या ठिकाणी दोन वाहनांना जाण्यास पुरेशी जागा होती, तेथे एकाच वेळी तीन वाहने आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. याचवेळी तिसरे वाहन असलेल्या फॉर्च्युनर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले ; राज ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप

फॉर्च्युनरमधील सर्व पाच जण हे पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे पथक, देवदूत यंत्रणा आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Priyanka Chopra : अ‍ॅक्शन थ्रिलर ब्लूफ्लायमध्ये झळकणार प्रियंका चोप्रा

दरम्यान, अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली. अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता मोकळा केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

या घटनेनंतर मिसिंग लिंक बोगद्यातील वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेषतः बोगद्यातील वाहनांचा वाढता वेग आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक कठोर उपाययोजनांची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

‘प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा लागेल’ प्रशांत किशोरांचा सुनेत्रा पवारांना स्पष्ट इशारा; तटकरेंवर नाराजी?

Exit mobile version