श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीचे सत्र सुरूच, जेवणाच्या वादातून हॉटेल मालकाची हत्या, तिघे आरोपी ताब्यात

नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघा जणांनी हॉटेल मालकांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.

Untitled Design 36

Untitled Design 36

Murder of hotel owner : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघा जणांनी हॉटेल मालकांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात एका हॉटेल मालकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वाताववरं निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये तीन ग्राहक दुपारच्या सुमारास जेवणासाठी आले होते. जेवण सुरू असतानाच त्यांचा हॉटेल मालकांसोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. सुरूवातील शाब्दिक चकमक म्हणून सुरू झालेला हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला. संतापलेल्या तिघांनी धारदार शस्त्र काढत हॉटेल मालकांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये उपस्थित ग्राहक आणि कर्मचारी घाबरून गेले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.

भारतीय पर्यटकांची व्हिएतनाम सहल ठरली दुर्दैवी; 32 पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट समुद्रात उलटली, 15 जणांचा मृत्यू

या हल्ल्यात आकाश शेखर दुबय्या आणि कुणाल दुबय्या हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दोघांनाही उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच आकाश शेखर दुबय्या यांची प्राणज्योत मालवली. तर कुणाल दुबय्या यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्तरांनी दिली आहे.

दरम्यान, या झटापटीत एका हल्लेखोराला देखील दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला देखील वैद्यकीय उपचार देण्यात आले असून पोलिसांच्या देखरेखीखाली त्याची चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वाकचौरे, श्रीरामपूर शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा केले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर पोलिसांनी शहरभर नाकेबंदी केली आणि विविध पथके शोधमोहीमेसाठी रवाना केली.

डायबिटीज रुग्णांसाठी मोठी खुशखबर; भारतात आले नवीन साप्ताहिक इन्सुलिन

गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात यश मिळवले. ओमकार डफळ, सुरेश जाधव आणि यश जाधव अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडे सध्या सखोल चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, वादाचे स्वरूप आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version