500 सीसीटीव्ही फुटेज, 2 हजार कॉल रेकॉर्ड अन् अखेर काँग्रेस नगसेवकाच्या हत्येचं गुढ उकललं
Congress corporator's murder नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील शुभम मोटघरेच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा गुन्हे शाखेने उलगडा केला आहे.
five Hundred CCTV footage, two thousand call records finally mystery of Congress corporator’s murder solved : नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीला विरोध केल्याने आणि याबाबत पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात गोळीबार करणाऱ्या आरोपीसह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कटाचा प्रमुख सूत्रधार अद्याप फरार आहे.
500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी
26 ऑगस्टच्या मध्यरात्री श्रावणनगर परिसरातील नगरसेवक मोटघरे यांच्या घरावर हा प्रकार घडला होता. दुचाकीवरून आलेल्या दोन मुखवटाधारी व्यक्तींनी घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीच्या दिशेने गोळी झाडून घटनास्थळावरून पलायन केले होते. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी सात स्वतंत्र पथके तयार केली. तपासादरम्यान परिसरातील 500 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक तपासासह कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर करून संशयितांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी 25 हजारांहून अधिक कॉल रेकॉर्ड, मोबाईल टॉवरची माहिती आणि आर्थिक व्यवहारांचीही छाननी केली. तपासादरम्यान सुमारे 50 हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा धागा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.
छत्तीसगडमधून मुख्य गोळीबार करणारा आरोपी जेरबंद
तपासात अंकुश तोमसकर (30) याने नगरसेवकाच्या घराच्या दिशेने गोळी झाडल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून अटक केली. तर ऋषभ उर्फ छोटू नागदेवे हा गोळीबाराच्या वेळी दुचाकी चालवत असल्याचे तपासात समोर आले.या प्रकरणात अमित ठाकरे, रोमित उर्फ पुल्या वाहणे, ऋषभ पैठल, केतन माटे आणि कार्तिक तोमसकर यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून आठ अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे 80 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
नगरसेवकाला घाबरवण्यासाठी कट?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वाठोडा परिसरातील अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंधित एका व्यक्तीने हा कट रचल्याचा संशय आहे. नगरसेवक शुभम मोटघरे यांना दहशत निर्माण करून इशारा देण्याच्या उद्देशाने गोळीबाराची सुपारी देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.हा गोळीबार केवळ धमकी देण्यासाठी करण्यात आला होता की यामागे आणखी मोठा कट होता, याचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह विविध तपास पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.