नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीसाठी २ डिसेंबरला पुणे जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

nagarpalika nd nagarparishad pune

elections

Nagar Panchayat And Nagar Palika Election : नगरपरिषद आणि नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी (Collector) तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली. पुणे (Pune) जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरूनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपालिकेच्या मतदारसंघात ही एक दिवसाची सुट्टी (Public Holiday) जाहीर करण्यात आली आहे.

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाच्या निमित्ताने संबंधित मतदारसंघाच्या बाहेर असतील, त्यांना देखील हा नियम लागू होणार आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुटी लागू होणार आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं.

दोन सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपली; आ. संतोष बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध; भाजप आमदाराचा दावा

त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीकरिता (Election) 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचं आवाहन देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं.

Exit mobile version