आता AI करणार सायबर हल्ल्यांपासून बचाव; OpenAI ने लाँच केले पॉवरफुल सिक्युरिटी टूल्स

OpenAI AI Cyber Security Tools कंपन्यांच्या सिस्टीम सुरक्षित ठेवण्यासाठी OpenAI चा मोठा निर्णय, 'Daybreak' प्लॅटफॉर्म लाँच

OpenAI AI Cyber Security Tools

OpenAI AI Cyber Security Tools

OpenAI AI Introduce Cyber Security Tools :  जगभरात सायबर गुन्हे आणि हल्ल्यांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून हॅकर्स नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कंपन्यांच्या सिस्टीमवर ताबा मिळवत आहेत. या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्र Hतील आघाडीची कंपनी ‘OpenAI’ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सायबर सुरक्षेला बळकटी देण्यासाठी कंपनीने ‘Daybreak’ या नवीन प्लॅटफॉर्म अंतर्गत ‘Daybreak Red Team’ आणि ‘Daybreak Defense Factory’ हे दोन अत्यंत उपयुक्त सिक्युरिटी टूल्स लाँच केले आहेत.

AI च्या वापरामुळे जसे दैनंदिन कामे सोपी झाली आहेत, तसेच सायबर गुन्हेगारांचे मार्गही बदलले आहेत. आता हैकर्स स्वतः AI चा वापर करून सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधत आहेत. याच पार्श्वभूमीवर कंपन्यांच्या डेटा आणि सिस्टीमचे रक्षण करण्यासाठी हे दोन नवीन टूल्स गेम-चेंजर ठरणार आहेत.

कसे काम करणार OpenAI चे हे दोन नवीन टूल्स?

Daybreak Red Team  हे टूल कोणत्याही वेब अप्लिकेशन आणि सॉफ्टवेअरच्या सुरक्षेची तपासणी करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यात अनेक डिजिटल एजंट्स एकत्र येऊन एखाद्या टीमप्रमाणे काम करतात. हे एजंट्स सॉफ्टवेअरचा सोर्स कोड आणि इतर माहिती तपासून त्यात काही सुरक्षेच्या त्रुटी आहेत का याचा शोध घेतील. तसेच हल्ला झाल्यास सॉफ्टवेअरच्या कोणत्या भागाला किती धोका निर्माण होऊ शकतो, याचे मूल्यांकन हे टूल करेल. हे टूल आधीपासून अस्तित्वात असलेले कोड स्कॅनर आणि सिक्युरिटी रिपोर्टची सत्यता पडताळण्यास मदत करते.

Daybreak Defense Factory : ‘Red Team’ ने शोधून काढलेल्या त्रुटींना दूर करण्यावर हे टूल प्रामुख्याने काम करेल. हे टूल कंपनीच्या कोडची तपासणी करून समस्येचे मूळ कारण शोधेल आणि ती समस्या दूर करण्यासाठी आवश्यक बदलांचा व कोडचा सल्ला देईल. डेव्हलपर्स हे सुचवलेले बदल तपासून योग्य वाटल्यास ते सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट केले जातील. हे टूल वेळेचे नियोजन करून नियमितपणे सिक्युरिटी स्कॅन चालवण्यासाठीही सेट करता येते.

कंपन्यांना कसा होणार फायदा?

आतापर्यंत कंपन्यांना बाहेरील सुरक्षा तज्ज्ञांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु, OpenAI च्या या स्वयंचलित टूल्समुळे कंपन्या स्वतःच्या सिस्टीममधील त्रुटी बाहेरून कोणतीही हानी होण्यापूर्वी शोधू शकतील आणि कमीत कमी वेळेत त्यावर उपाययोजना करू शकतील. सध्या हे दोन्ही टूल्स सुरुवातीच्या ऍक्सेस प्रोग्राम अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Exit mobile version