पाकिस्तानची अफगान विरूद्ध युद्धाची घोषणा! पाकच्या एअर स्ट्राईकला तालिबानचं आक्रमक उत्तर

Pakistan Afghanistan war पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमावाद उफाळला. पाकिस्तानची अफगाणिस्तान विरुद्ध युद्धाची घोषणा

Pakistan Afghanistan War

Pakistan Afghanistan War

Pakistan declares war on Afghanistan! Taliban’s aggressive response to Pakistan’s air strike : जगामध्ये सर्वत्र तणावाचं वातावरण असताना आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तान विरुद्ध युद्धाची घोषणा केली. यामध्ये पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या लष्करी तळांवर एअर स्ट्राइक केला. ज्यामध्ये काबुल, पक्तिया आणि कंधार या भागात हवाई हल्ले करण्यात आले. त्याला अफगाणिस्तान सरकारने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. पक्तिया, खोस्त, नंगरहार, कुनार आणि नुरीस्तान या भागामध्ये पाकिस्तानच्या सैन्याला परतवून लावलं आहे.

उपमुख्यमंत्री सनेत्रा पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, काय होत प्रकरण?

दरम्यान यामध्ये पाकिस्तानने त्यांच्या या सैन्याच्या ऑपरेशनला ‘गजब लिल- हक’ हे नाव दिले असून पाकिस्तानकडून दावा करण्यात आला आहे की, त्यांनी तालिबानचे सुरुवातीच्या हल्ल्यामध्ये तब्बल 130 हून अधिक तालिबानी सैनिक मारले. त्यावर तालिबानने दावा केला आहे की, आम्ही पाकिस्तानचे 55 सैनिक मारले आहेत, याबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असेल यांनी पुष्टी केली आहे.

Exit mobile version