Phaltan Doctor Rajendra Rupnawar Dies : फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र रुपनवर (Rajendra Rupnawar) यांचा मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरातील मोबाईल टॉवरवर चढून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातील कथित अंतर्गत वाद आणि बदलीच्या कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे.
रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’च्या माध्यमातून नव्या प्रवासाला सुरुवात
डॉ. रुपनवर यांनी यापूर्वीही हातावर सुसाईड नोट लिहून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली असून, न्याय मिळेपर्यंत त्यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील MARD संघटनेचे पदाधिकारी तसेच डॉक्टरांनीही कुटुंबीयांना पाठिंबा दिला आहे. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलनात सहभागी राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
मोदींच्या फोटोवरून ठिणगी; भाजपची आक्रमक भूमिका, अमित ठाकरेंसह 25 जणांवर गुन्हा दाखल
‘शेवटचा जबाब स्वेच्छेने दिला की दबावाखाली?’
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रुपनवर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून मुंबईतील जेजे मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्यानंतर फलटणच्या शासकीय रुग्णालयात सेवा सुरू केली, असा उल्लेख अंधारे यांनी केला आहे.
सुमारे दीड महिन्यापूर्वी रुपनवर यांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे अंधारे यांनी सांगितले. मात्र, वरिष्ठांकडून पुन्हा त्रास होईल किंवा नोकरीवर परिणाम होईल, या भीतीमुळे ते उघडपणे बोलण्यास तयार नव्हते, असा दावा त्यांनी केला.
Lionel Messi : मोठी बातमी! लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, पत्रकार आणि रुपनवर यांचे डॉक्टर मित्र यांनीही त्यांना आपली बाजू मांडण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी त्यावेळी मौन बाळगले. काही दिवसांपासून त्यांच्यावर पुन्हा मानसिक दबाव वाढला असावा, अशी शक्यताही अंधारे यांनी व्यक्त केली. त्यांनी शेवटच्या क्षणी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचेही अंधारे यांनी म्हटले आहे.
शेवटच्या जबाबावरूनही प्रश्नचिन्ह
सायन परिसरातील टॉवरवरून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर रुपनवर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याच पार्श्वभूमीवर अंधारे यांनी रुपनवर यांच्या आधीच्या आणि शेवटच्या जबाबातील कथित फरकाकडे लक्ष वेधले आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या मृत्यूस जबाबदार असल्याचे सांगत काही व्यक्तींची नावे हातावर लिहिल्याचे समोर आले होते. मात्र शेवटच्या जबाबात त्यांनी कोणाविरोधात तक्रार नसल्याचे सांगितल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. तसेच मृत्यूनंतर आपला देह वैद्यकीय महाविद्यालयाला प्रशिक्षणासाठी दान करण्यात यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचेही सांगितले जात आहे.
फडणवीसांनी पुण्यातील डीजेचा प्रश्न टाळला की हुशारीने बाजू बदलली? बॅकफुट की डॅमेज कंट्रोल?
या पार्श्वभूमीवर हा शेवटचा जबाब त्यांनी स्वतःच्या इच्छेने दिला की कोणाच्या दबावाखाली, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. फलटणच्या शासकीय रुग्णालयातील कार्यपद्धती, तेथील डॉक्टरांवर येणारे कथित मानसिक दडपण आणि यापूर्वीच्या घटनांबाबतही सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘डॉ. रुपनवर यांनी दीड महिन्यापूर्वीच मोकळेपणाने आपली बाजू मांडली असती, तर कदाचित त्यांच्यासाठी काही करता आले असते,’ अशी खंतही अंधारे यांनी व्यक्त केली आहे.
