Prashant Kishor Meets Sunetra Pawar: रणनीतीकार आणि बिहारमधील बांकीपूरचे आमदार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी गुरुवारी (6 ऑगस्ट) राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची भेट घेतली. या बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार यांचीही उपस्थिती होती. तब्बल सहा तास झालेल्या या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) संघटनात्मक वाटचालीसह पक्षातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
Maharashtra Rain Alert : अमरावती, सातारासह आज ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी आखण्यात येणाऱ्या रणनीतीची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल, तर राज्यातील नेतृत्वासोबत योग्य समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते.
धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना एकनाथ शिंदे घेणार PM मोदींची भेट
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची प्रशांत किशोर यांच्यासोबत यापूर्वीही तीन बैठका झाल्या आहेत. या चर्चांदरम्यान पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाच्या कामकाजात काही बदल करण्याच्या सूचना किशोर यांनी केल्याची माहिती आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या चर्चांमध्ये मांडलेल्या मुद्द्यांवर अपेक्षित पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Vijay Chaudhary : भाजप नेते विजय चौधरी यांना अटक ; ऑडिओ क्लिपप्रकरणात कारवाई
याशिवाय, भविष्यातील निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती आखण्याची आणि त्यावर काम करण्याची जबाबदारी आपल्याकडे सोपवायची असेल, तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याची भूमिका प्रशांत किशोर यांनी बैठकीत मांडल्याचे समजते.
प्रशांत किशोर यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आगामी संघटनात्मक बदलांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्ष नेतृत्व कोणता निर्णय घेणार, तसेच सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत पुढे काय घडणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
