पंतप्रधान मोदी अन् फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मुंबईत महत्त्वपूर्ण करार करणार, कोणते मुद्दे महत्वाचे?

ही उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. भारत-फ्रान्स संबंधांच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Modi Macron

पंतप्रधान मोदी अन् फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मुंबईत महत्त्वपूर्ण करार करणार, कोणते मुद्दे महत्वाचे?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन (Modi) आज मुंबईत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. दुपारी 2.30 वाजता मुंबईतील लोकभवन (पूर्वीचे राजभवन) येथे ही उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. भारत-फ्रान्स संबंधांच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

संरक्षण क्षेत्रावर चर्चा

या बैठकीत संरक्षण सहकार्य, तंत्रज्ञान, ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील रणनीतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांचा भर राहणार आहे. विशेषतः संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा, हरित ऊर्जा प्रकल्प तसेच नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर, अनेक ठिकाणी वाहतूक मार्ग बंद

उद्योग आणि गुंतवणुक महत्वाची

मॅक्रोन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण, स्टार्टअप्स सहकार्य आणि शैक्षणिक भागीदारी वाढवण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे. मुंबई हे आर्थिक राजधानीचे शहर असल्याने उद्योग आणि गुंतवणुकीशी संबंधित मुद्द्यांनाही बैठकीत प्राधान्य दिले जाईल.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर लोकभवन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुंबई पोलिस, विशेष सुरक्षा दल आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून परिसरात वाहतूक नियंत्रणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाची भेट

भारत-फ्रान्स संबंध मागील काही वर्षांत अधिक दृढ झाले असून संरक्षण, अवकाश संशोधन आणि हवामान बदलाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ सहकार्य आहे. आजची बैठक या संबंधांना नवी दिशा देणारी ठरण्याची शक्यता आहे.

Exit mobile version