मोठी बातमी! पुणे महापालिकेच्या बनावट नोकरभरती घोटाळ्यात कारवाई; मुख्य सूत्रधार राजेंद्र खेडेकरला अटक

Pune Municipal Corporation Recruitment Scam : पुणे महापालिकेतील नोकरभरती घोटाळ्यात मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली.

News Photo   2026 09 29T214641.015

Pune Municipal Corporation Recruitment Scam

Pune Municipal Corporation Recruitment Scam : बनावट नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी पुणे महापालिकेशी संबंधित प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. (Pune) गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या राजेंद्र खेडेकरला अखेर पोलिसांनी अटक केली. महापालिकेत नोकरी लावुन देण्याचं आमिष दाखवत शेकडो युवकांकडुन कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप खेडेकरवर आहे.

अटकेनंतर खेडेकरला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात खेडेकर मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असुन, त्याच्याकडुन घोटाळ्याशी संबंधित महत्वाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडुन केला जात आहे.

धक्कादायक! कठुआत CISF छावणीत जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; चार जवानांचा मृत्यू

महापालिका प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पडताळणीत या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. आरोपींनी दिलेली नियुक्तीपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. या पत्रांवर महापालिकेचे चिन्ह, वॉटरमार्क यांचा बेकायदेशीर वापर करण्यात आला होता. तसेच महापालिकेचे उपायुक्त व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्के मारून तरुणांची फसवणूक करण्यात आली होती.

याप्रकरणी डॉ. राजेंद्र खेडेकर आणि त्याच्या टोळीविरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तीन वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील दोन महिन्यांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर शिवाजीनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या बनावट नोकरभरती प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version