Rahul Gandhi Holds Press Conference on Delhi Student Protest: दिल्लीतील शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या असंतोषामागे शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि बेरोजगारी ही प्रमुख कारणे असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदी सरकार विद्यार्थ्यांप्रती संवेदनाहीन; पत्रकार परिषद घेत राहुल गांधींकडून सरकारची पोलखोल
पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, “काही दिवसांपासून देशातील विद्यार्थ्यांच्या मनात राग आहे, तरीसुद्धा ते शांततापुर्ण आंदोलन करत आहेत. त्याचं पहिलं कारण म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था आहे. आपली शिक्षण व्यवस्था एकेकाळी खुप प्रसिद्ध होती. पण आता हिच शिक्षण व्यवस्था भ्रष्ट झाली आहे. मागच्या 10 वर्षांत 152 पेपरफुटी झाल्या. गरीब विद्यार्थी परिक्षांचा खुप अभ्यास करतात आणि ज्यांच्याजवळ पैसा आहे ते चक्क पेपरच विकत घेतात. अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा काहीच उपयोग नाही. तसेच याचं दुसरं कारण म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था गरिबांना परवडणारी नाही आणि तिसरं कारण म्हणजे बेरोजगारी, जी आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आहे. सरकारी नोकरीही त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे पैसे आहेत. या सगळ्या गोष्टींचा राग विद्यार्थ्यांच्या आणि देशातील बेरोजगार तरुणांच्या मनात आहे.”
विरोधी पक्ष विद्यार्थी आंदोलकांचा राजकीय शस्त्रांसारखा वापर करत आहे-राजनाथ सिंह
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शांततापूर्ण असल्याचे सांगत, त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेला असंतोष हा केवळ एका घटनेपुरता मर्यादित नसून, शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि रोजगाराच्या संधींच्या अभावामुळे तो निर्माण झाला असल्याचा दावा त्यांनी केला.
व्हायरल पत्र बनावट; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा खोटा
शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, पेपरफुटीच्या घटना आणि बेरोजगारीमुळे विद्यार्थी व तरुणांमध्ये निराशा वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दडपशाही करण्याऐवजी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
