राहुल गांधी नाशिकमध्ये; भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा विरोध ! नेमकं कारण काय?

Rahul Gandhi Nashik Tour महिला कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून तसेच हाताला काळ्या फिती बांधून काँग्रेसच्या या भूमिकेचा निषेध नोंदवला.

Rahul Gandhi Nashik Tour

Rahul Gandhi in Nashik as BJP stages protest over Congress : काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा आज नाशिकमध्ये समारोप होतोय. संगठन सृजन अभियानातून निवडलेल्या जिल्हाध्यक्षांसाठी हे शिबिर घेण्यात आले असून, समारोपाच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षाच्या नव्या जिल्हाध्यक्षांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; FIR दाखल करण्याचे आदेश, CBI कडे तपास

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याच्या (Rahul Gandhi Nashik Tour) पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले. केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती वंदन विधेयका’ला काँग्रेसने लोकसभेत विरोध केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. याच मुद्द्यावरून भाजपच्या महिला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी नाशिकमध्ये आंदोलन करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

आता ‘जिथे शिंदे, तिथे सौदा’ अशी नवी डिक्शनरी; पक्ष अन् चिन्हा सुनावणीपूर्वी राऊतांचा घणाघात

या आंदोलनात आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, रश्मी हिरे-बेंडाळे, शहराध्यक्ष सुनील केदार, नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिला कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून तसेच हाताला काळ्या फिती बांधून काँग्रेसच्या या भूमिकेचा निषेध नोंदवला.

महिला आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग मोकळा होतो, मात्र काँग्रेसने या विधेयकाला विरोध केल्याचा दावा भाजप आंदोलकांनी केला आहे. महिलांच्या राजकीय हक्कांबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यावेळी भाजप आंदोलकांकडून करण्यात आली.

जरांगे खालावले, मराठे पेटले! बीड-जालन्यात जाळपोळीसह मोठा राडा!

राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल होत असतानाच भाजपकडून आंदोलन करण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण काही काळ तापले होते. होणारा अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह काँग्रेस कार्यालय आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

follow us