संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आमचं कुटुंब होत. त्यानंतर किमान 60 वर्ष ठिक गेले. पण आज मुंबईचे लचके तोडायचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे उपरे मुंबई तोडायचा प्रयत्न करत आहेत. हे सगळ थांबण्यासाठी आम्हाला आमचं कर्तव्य बजवाव लागणार आहे. आम्ही ठाकरे बंधू एकत्र आलोत ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या आयोजीत पत्रकार परिषदेतून थेट वार केले आहेत. तसंच, आता ठाकरे आर की पार ठरवून मैदानात उतरल्याचं सांगितलं आहे. यावेळी व्यासपीठावर मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते.
कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं म्हणत, मी जे काही बोलायच आहे ते माझ्या जाहीर सभेत बोलेलं असं म्हणत राज ठाकरेंनी आता आम्ही सर्व मतभेद विसरून आम्ही एकत्र आलो आहोत अशी घोषणा केली. याचवेळी गेली अनेक दिवसांपासून तुम्ही जे प्रतिक्षेत होता ती शिवसेना आणि मनसे युती झाली आहे असंही ते म्हणाले. त्याचेळी महाराष्ट्रात लहान मुलांना पळवण्याची टोळी सध्या सक्रीय आहे. तशी राजकारणातील तुरणांना पळवणारीही टोळी सक्रीय आहे असं म्हणज नाव न घेता राज ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे.
20 साल बाद! उद्धव-राज युती भाजप-महायुतीसाठी डोकेदुखी; मतदारांच्या आकड्यांचं गणित चक्रावणारं
तारीख- 18 डिसेंबर 2005, ठिकाण- शिवाजी पार्क जिमखाना. राज ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषद बोलावली होती. ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेपासून वेगळे होण्याची घोषणा केलेली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणालेले की, ‘त्यांनी आदर मागितला होता, पण त्यांना फक्त अपमान आणि अपमान मिळाला.’ खरं तर, राज ठाकरे यांना शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय उत्तराधिकारी मानले जात होते. कारण ते उद्धव यांच्यापेक्षा पक्षात अधिक सक्रिय होते आणि त्यांची प्रतिमा देखील त्यांचे काका बाळासाहेबांसारख्याच एका ज्वलंत नेत्याची होती. पण त्यावेळी मतभेद झाले म्हणून ते बाहेर पडले होते. आज 20 वर्षांनी पत्रकार परिषद घेत दोन्ही बंधुंनी एकत्र आल्याची घोषण केली आहे.
ठाकरे बंधूंची युती कुठं कुठं?
मुंबई
ठाणे
मिरा-भाईंदर
कल्याण-डोंबिवली
नवी मुंबई
नाशिक
पुणे
दोन्ही ठाकरेंचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
शिवसेना ठाकरे गट – 140 ते 150 जागांवर निवडणूक लढवणार.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष -60 ते 70 जागांवर निवडणूक लढवणार.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – 15 ते 20 जागा शिवसेना ठाकरे गटातील कोट्यातून सोडणार.
