Rajkot Airport Fire Incident: राजकोटच्या हिरासर आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीजवळील वाळलेल्या गवताला आग लागल्याने विमान वाहतुकीवर परिणाम झाला. विमानतळापासून पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी फोडण्यात आलेल्या फटाक्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आणि धावपट्टीवरील दृश्यमानता कमी झाली. त्यामुळे दिल्लीहून राजकोटला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग रोखण्यात आले.
‘त्या’ शेतकऱ्याच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ नये’; आमदार गायकवाड काल बोलून गेले अन् आज युटर्न मारला…
हे विमान सकाळी 10:25 वाजता राजकोटला पोहोचणार होते. मात्र, धावपट्टीवर धुराचे प्रमाण जास्त असल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) लँडिंगची परवानगी दिली नाही. परिणामी, वैमानिकाला सुरक्षित लँडिंगसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली. विमानाने हवेत चार फेऱ्या मारल्यानंतर ते वडोदऱ्याकडे वळवण्यात आले. तिथे विमानातील 100 हून अधिक प्रवाशांनी सुरक्षितपणे लँडिंग केले.
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा! रवींद्र धंगेकरांची मोठी मागणी, महायुतीत भाजप-शिवसेनेत जुंपली
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमान वडोदऱ्याहून पुन्हा राजकोटला आले. दुपारी 12:20 वाजता ते राजकोट विमानतळावर पोहोचले. त्यानंतर दुपारी 1:11 वाजता हे विमान दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.
ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील…
या घटनेमुळे प्रवाशांना अनेक तास विलंबाचा सामना करावा लागला. पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि धावपट्टीच्या आसपासच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने चर्चेत आला आहे. मात्र, आगीचे नेमके कारण आणि विमानाचे मार्गांतर याबाबत संबंधित प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेचे स्पष्ट कारण तपासानंतरच समजू शकेल.
