सोने-चांदीसह बिटकॉइनच्या दरात मोठी घसरण; ‘बिटकॉइनच्या घसरणीमुळे मी उत्साहित’, रॉबर्ट कियोसाकी आणखी खरेदीच्या तयारीत!

Robert Kiyosaki; सोने-चांदीसह बिटकॉइनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र, रॉबर्ट कियोसाकी या घसरणीकडे गुंतवणुकीची संधी म्हणून पाहत आहेत.

Robert Kiyosaki on Gold Silver Bitcoin Price Crash

Robert Kiyosaki on Gold Silver Bitcoin Price Crash

Robert Kiyosaki on Gold Silver Bitcoin Price Crash: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. आज (20 नोव्हेंबर) मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी पडझड झाली. सोन्याच्या दरात झालेली ही घसरण गेल्या काही महिन्यांतील सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरणींपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. मात्र, या घसरणीमुळे प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी अजिबात चिंतेत नाहीत. उलट, बाजारातील ही घसरण त्यांच्यासाठी खरेदीची संधी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Local Crime Branch : थेट घरातूनच सुरू होती गांजाची विक्री… स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

‘रिच डॅड पुअर डॅड’ (Rich Dad Poor Dad) या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी 20 नोव्हेंबर रोजी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या घसरणीवर आपली प्रतिक्रिया दिली. बाजारातील ही घसरण चांगली की वाईट, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “बाजारातील घसरण: चांगली की वाईट? सोने, चांदी आणि बिटकॉइन कोसळत आहेत. ज्यांचे मनोधैर्य कमकुवत आहे ते विक्री करत आहेत, तर ज्यांचे मनोधैर्य खंबीर आहे ते खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत का?”

पुढे त्यांनी बिटकॉइनच्या घसरणीबाबत उत्साह व्यक्त केला. “बिटकॉइनच्या घसरणीमुळे मी अत्यंत उत्साहित आहे. मी आणखी खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत आहे,” असे त्यांनी म्हटले.

सोन्याच्या दरात मोठी घसरण का?

रॉबर्ट कियोसाकी यांनी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह, बँका आणि बाँड बाजारांवरही टीका केली आहे. या संस्थांच्या कथित अकार्यक्षमतेमुळे अमेरिकेचे कर्ज आणखी वाढेल, असे त्यांचे मत आहे.

दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी सिंगापूरमध्ये सकाळी 10:15 वाजता सोन्याचा भाव 2.3 टक्क्यांनी घसरून 3,543.19 डॉलर प्रति औंस (31.10 ग्रॅम) झाला होता. त्याआधी सोन्याच्या दरात 2.4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. या आठवड्यात सोन्याच्या किमतीत सुमारे 9 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

IND vs NZ : भारताचे जोरदार पुनरागमन! राहुल-जायसवालची दमदार फलंदाजी; 10 वर्षांनंतर मोडला ‘हा’ विक्रम

अमेरिकेत महागाई कायम असल्याने फेडरल रिझर्व्हने कठोर आर्थिक धोरण कायम ठेवले आहे. भविष्यात व्याजदर वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. व्याजदर आणि बाँड यील्ड वाढल्यास सोन्यासारख्या मालमत्तेवरील गुंतवणुकीचा आकर्षण कमी होते. कारण सोन्यातून गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळत नाही.

याशिवाय तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचाही सोन्याच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. इतर गुंतवणुकीतील नुकसान भरून काढण्यासाठी काही गुंतवणूकदार सोन्याची विक्री करून रोख रक्कम उभी करत असल्याचे सांगितले जात आहे.

देशांतर्गत बाजारातही सोने-चांदी स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारपेठेतही दिसून आला. शुक्रवारी एमसीएक्सवर डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचे वायदे 3.94 टक्क्यांनी घसरून 1,22,430 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडले. तर चांदीचे वायदे 5.73 टक्क्यांनी घसरून 1,48,466 रुपये प्रति किलोवर आले.

यापूर्वीही घसरणीत केली होती खरेदी

सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या किमती घसरत असताना खरेदी करण्याची भूमिका कियोसाकी यांनी यापूर्वीही मांडली होती. 4 नोव्हेंबर रोजी त्यांनी सांगितले होते की, बाजारात किमती घसरल्यामुळे अनेक गुंतवणूकदार घाबरले होते, मात्र त्यांनी या काळात अधिक सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी केले.

लोणावळ्यातील 4 मोठ्या हॉटेल्सवर FDA ची धडक कारवाई; ऑर्किड, रिदम, फर्न आणि बेसिलिकाचे परवाने निलंबित

‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते, “जेव्हा सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या किमती कोसळल्या, तेव्हा लोक घाबरले होते; पण मी अधिक खरेदी केली.”

अमेरिकेचे वाढते कर्ज आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा दाखला देत त्यांनी पारंपरिक आर्थिक व्यवस्थेवरही टीका केली होती. सरकारी चलनांमुळे कष्ट करून बचत करणाऱ्या लोकांच्या संपत्तीचे मूल्य कमी होत असल्याचे त्यांचे मत आहे. “मी सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या पुढील घसरणीची वाट पाहत आहे,” असेही त्यांनी म्हटले होते.

पुढील पाच वर्षांत सोने 35 हजार डॉलरवर जाणार?

सोन्याच्या दरात सध्या मोठी घसरण होत असली, तरी रॉबर्ट कियोसाकी यांचा दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक आहे. जून 2026 मध्ये त्यांनी पुढील पाच वर्षांत सोन्याचा भाव 35,000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला होता.

 

मात्र, सोन्याच्या किमतीतील अल्पकालीन घसरणीचा अंदाज चुकल्याचेही त्यांनी मान्य केले होते. 29 जून रोजी त्यांनी ‘एक्स’वर लिहिले होते, “मी चुकीचा होतो. सोन्याच्या किमती अजूनही कोसळत आहेत!”

‘प्यार का पंचनामा 2’मध्ये अभिनयाची संधी हुकली, पण शर्वरीला मिळालं मोठं काम; ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर उलगडला प्रवास!

जागतिक कर्जवाढ, सरकारकडून मोठ्या प्रमाणात पैशांची निर्मिती आणि पारंपरिक चलनांची घटती क्रयशक्ती यामुळे भविष्यात आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते, असे कियोसाकी यांचे मत आहे. त्यामुळे सोने, चांदी आणि बिटकॉइन यांसारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यावर त्यांचा भर आहे.

त्यामुळे सध्याच्या बाजारातील घसरणीकडे ते नुकसान म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी म्हणून पाहत आहेत.

Exit mobile version