तुम्ही फक्त डोक बदलणार असाल (Modi) तर फार काही होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा आता मलिन झालेलील आहे. गृहमंत्री अमित शाह यांना प्रतिमाच राहिलेली नाही. आज मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये अर्थ्यापेक्षा जास्त मंत्री अकार्यक्षम आहेत. नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान सोडले तर या सरकारची काय परिस्थिती आहे? आज जर पाहिल तर मोदी हे कमालीचे थकले आहेत, त्यांनी राष्ट्रकार्यासाठी बाजूला व्हाव असा थेट वार शिवसेना ठाकेर गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आज मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री अकार्यक्षम आहेत. नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान यांना सोडलं तर या सरकारची काय परिस्थिती आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारच्या नेतृत्वावर आणि मंत्रिमंडळाच्या कार्यक्षमतेवर त्यांनी निशाणा साधला. 2024 मध्येही त्यांनी गडकरींच्या राजकीय भूमिकेवरून मोदी-शहा यांच्यावर आरोप केले होते.
राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार?, भाजपच्या संसदीय मंडळात फडणवीसांना संधी?, दिल्लीतील चर्चांना वेग
नरेंद्र मोदी कमालीचे थकले आहेत. त्यांनी राष्ट्रकार्यासाठी बाजूला व्हावं, असं म्हणत राऊत यांनी मोदींच्या नेतृत्वावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. देशाच्या राजकारणात नेतृत्वबदलाची गरज असल्याचा सूर त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला. मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जावच लागेल. आज अमित शहांसोबत कोणताही कार्यक्षण नेता काम करण्यास तयार नाही. फडणवीसही शहांसोबत काम करण्यास तयार नाहीत, पण स्वत: मोदीही शहांसोबत काम करण्यास तयार नाहीत असा धक्कदायक दावा राऊतांनी यावेळी केला आहे.
