Silver Price Down: गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जानेवारी महिन्यात चांदीने प्रति किलो 4 लाख 20 हजार रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र नोव्हेंबरमध्ये चांदीचे दर घसरून सुमारे 1 लाख 75 हजार रुपयांवर आले आहेत. म्हणजेच अवघ्या 10 महिन्यांत चांदीच्या दरात किलोमागे तब्बल 2 लाख 45 हजार रुपयांची घट झाली आहे. ही घसरण जवळपास 58 टक्के आहे.
हिवाळी अधिवेशनात खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम घालणारे विधेयक येणार!
चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना दिलासा
काही महिन्यांपूर्वी चांदीचे वाढलेले दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. त्यामुळे अनेक ग्राहकांनी चांदी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र आता दरात मोठी घसरण झाल्याने बाजारातील चित्र बदलताना दिसत आहे. चांदीच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहक, गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
सोन्याचे दरही घसरले
दुसरीकडे सोन्याच्या दरातही घसरण सुरूच आहे. गुरुवारी दिल्लीत सोन्याच्या दरात तोळ्यामागे 1,300 रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचा दर 1 लाख 34 हजार 500 रुपये प्रति तोळा झाला. तर चांदीच्या दरात किलोमागे 2,500 रुपयांची घसरण होऊन भाव 1 लाख 62 हजार रुपयांवर पोहोचला.
तुकाराम मुंढेंच्या FDA चा राज्यभरात कारवाईचा धडाका! 2.23 कोटींचा अन्नसाठा जप्त, 23 परवाने निलंबित
सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे ग्राहकांचे लक्ष बाजाराकडे लागले आहे. आगामी काळात या दरांमध्ये आणखी किती बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
