‘मला रणनीतीकारांची गरज नाही’; प्रशांत किशोर- सुनेत्रा पवार भेटीवर सुनिल तटकरेंची स्पष्ट भूमिका

Sunil Tatkare On Prashant Kishor केवळ भेट झाली म्हणून त्यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली, असे समजण्याचे कोणतेही कारण नाही."

Sunil Tatkare On Prashant Kishor

Sunil Tatkare On Prashant Kishor

Sunil Tatkare On Prashant Kishor Sunetra Pawar Meeting: बिहारमधील बांकीपूरचे आमदार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या कार्यशैलीवर चर्चा झाल्या, अशी माहीती आहे. त्या चर्चांवर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”योग सुरू आहे ना?”, PM मोदींचा ओमराजेंना खास प्रश्न; फिटनेसवर रंगली चर्चा

प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, असे तटकरे म्हणाले, “त्यांची भेट झाल्याची माहिती मला मिळाली. मात्र, त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची मला माहिती नाही. केवळ भेट झाली म्हणून त्यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली, असे समजण्याचे कोणतेही कारण नाही.”

‘मी फिल्डमध्ये काम करणारा माणूस’

निवडणूक रणनीती आणि सर्व्हेच्या चर्चेवर भाष्य करताना तटकरे यांनी आपल्या राजकीय अनुभवावर भर दिला. “मी माझ्या आयुष्यात कधीही निवडणुकीचा सर्व्हे केला नाही. मला अशा रणनीतीकारांची किंवा सर्व्हेची गरज नाही. मी फिल्डमध्ये काम करणारा माणूस आहे. गावातील लोक, शेतकरी आणि तरुणांशी संवाद साधल्यानंतर मला जनमताचा अंदाज येतो. मी आठ वेळा संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे. राज्याचा कानाकोपरा मला माहिती आहे,” असे ते म्हणाले.

‘प्रशांत किशोर पक्षासाठी काम करतात की नाही, माहिती नाही’

प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीशी जोडली जात असलेली चर्चा फेटाळताना तटकरे म्हणाले, “ते मोठे रणनीतीकार असतील, पण ते आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही, याची मला माहिती नाही. त्यांच्या नियुक्तीचा कोणताही निर्णय झाला असता, तर त्याची माहिती मला नक्कीच असती.”

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती; आमदार अमोल खताळांची रेल्वेमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

‘आम्ही एनडीएमध्येच आहोत’

राजकीय आघाड्यांबाबत बोलताना तटकरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. “आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक आहोत. दादांच्या निधनानंतरही या मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण आमची भूमिका बदललेली नाही,” असे त्यांनी सांगितले. तसेच प्रशांत किशोर हे बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणूकीत भाजपविरोधात निवडून आलेत, ती त्यांची भुमिका आहे.

कामाची बातमी! मोबाईलचा EMI थकताच फोन लगेच लॉक होणार?; RBI ने सांगितले नियम

‘सर्व्हे चुकीचा नाही, पण अनुभव महत्त्वाचा’

निवडणूक सर्व्हेबाबत बोलताना तटकरे म्हणाले, “सर्व्हे करणे चुकीचे नाही. मात्र, आम्ही प्रत्यक्ष जनतेत काम करणारे लोक आहोत. त्यामुळे आम्हाला परिस्थितीचा अचूक अंदाज असतो. मला माझं राजकीय गोत्र माहिती आहे आणि राजकारणातील घडामोडींची जाणीव आहे.” प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चांवर तटकरेंनी अशा शब्दांत स्पष्टीकरण देत कोणत्याही राजकीय तर्कांना फारसे महत्त्व नसल्याचे सूचित केले.

Exit mobile version