आमदारकी, खासदारकी 100 वेळा कुर्बान; दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी, अंधारेंची प्रतिक्रिया चर्चेत

ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे

News Photo   2026 04 29T174213.388

आमदारकी, खासदारकी 100 वेळा कुर्बान; दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी, अंधारेंची प्रतिक्रिया चर्चेत

ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील विधानपरिषद (MLC) निवडणुकांसाठी नाव जाहीर करण्यात आलं आहे. मविआचे उमेदवार म्हणून स्वत: उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची उमेदवारी घ्यावी, असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेककडूनही केला जात होता. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीवर असलेलं नाव मागे घेत स्वत: उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलं.

या स्पर्धेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचेही नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यातच, या घोषणेनंतर सुषमा अंधारेंनी आपली भूमिका मांडली आहे. आमदारकी, खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान”, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी एकप्रकारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमवेतचा व्हिडिओ शेअर करत, उद्धव ठाकरेंशी असलेलं नातंच आपल्यासाठी सर्वस्व असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमधून सूचवलं आहे.

Ambadas Danve : गद्दारांना गाडण्यासाठी ठाकरेंचा मराठवाडा प्लॅन; दानवेंच्या उमेदवारीची 5 मोठी कारणं!

उद्धव ठाकरेंना राखी बांधतानाचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी शेअर केला आहे. दरम्यान, भाजपने आपल्या 6 उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी आणि शिंदेंच्या शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांना होती. त्यातच, आज ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर करत अंबादास दानवेंना दुसऱ्यांदा संधी दिली.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुषमा अंधारे यांचेही नाव आघाडीवर होते. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची देखील चर्चा होती. त्यामुळे, अचानक त्यांची नावाची घोषणा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, ठाकरेंकडून अंबादास दानवेंचं नाव जाहीर करण्यात आलंय. त्यानंतर, सुषमा अंधारेंनी एका ओळीत आणि व्हिडिओतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे. त्यातूनच, काँग्रेस विधानपरिषेदेत आपला उमेदवार देणार असल्याची माहिती पुढे येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवाराचं नाव जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Exit mobile version