Tata Trusts challenge N. Chandrasekaran’s reappointment in court: टाटा समूहातील अंतर्गत वाद (Tata Trusts vs Tata Sons Dispute) आता न्यायालयात पोहोचला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (N. Chandrasekaran) यांची पुन्हा नियुक्ती करण्याच्या निर्णयाला टाटा ट्रस्ट्सने विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात टाटा ट्रस्ट्सने मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र दावे दाखल केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी (27 नोव्हेंबर 2026) दुपारी 3 वाजता होणार आहे.
जंक फूडच्या पाकिटावर आता ‘रेड वॉर्निंग’!; इस्रायल, चिली, मेक्सिकोचा अनुभव काय ?
टाटा सन्सच्या (Tata Sons) संचालक मंडळाने 17 सप्टेंबर 2026 रोजी बहुमताने चंद्रशेखरन यांना आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्षपदी नियुक्त करण्यास मंजुरी दिली होती. त्यांचा नवा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. मात्र, ही नियुक्ती टाटा सन्सच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा टाटा ट्रस्ट्सने केला आहे.
टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट्सचा 66 टक्के हिस्सा आहे. या प्रकरणात सर दोराब टाटा ट्रस्टने 50 कोटी रुपये, तर आर. डी. टाटा ट्रस्टने 15 कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. आर. डी. टाटा ट्रस्टने या रकमेवर 18 टक्के व्याजाचीही मागणी केली आहे. हे दावे टाटा सन्स आणि नोएल टाटा यांच्यासह सहा संचालकांविरोधात दाखल करण्यात आले आहेत.
30 नोव्हेंबरच्या बैठकीबाबतही न्यायालयात मागणी
टाटा सन्सच्या संचालक मंडळाची पुढील बैठक 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत ट्रस्ट्सने नामनिर्देशित केलेले संचालक वेगवेगळ्या बाजूने मतदान करत असतील, तर चंद्रशेखरन यांनी निर्णायक मताचा (कास्टिंग व्होट) वापर करू नये, अशी मागणी ट्रस्ट्सने केली आहे.
अमेरिकेतील प्रत्येक मुलाला मिळणार ‘स्पेस एक्स’ चे 2 शेअर्स; इलॉन मस्क यांची मोठी घोषणा
टाटा ट्रस्ट्सच्या मते, संचालक मंडळात ट्रस्ट्सने नियुक्त केलेल्या सदस्यांनी एकमताने मतदान करणे आवश्यक आहे. मात्र, मागील बैठकीत नोएल टाटा यांनी काही प्रस्तावांच्या विरोधात, तर वेणू श्रीनिवासन यांनी त्याच प्रस्तावांच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे हे मतदान नियमांनुसार वैध नसल्याचा दावा ट्रस्ट्सने केला आहे.
टाटा सन्सच्या लिस्टिंगलाही ट्रस्ट्सचा विरोध
टाटा सन्स शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टिंग) होण्याच्या प्रक्रियेबाबतही मतभेद आहेत. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार टाटा सन्स लिस्टिंगची तयारी करत असल्याची माहिती आहे. मात्र, टाटा ट्रस्ट्सचा या प्रक्रियेला विरोध आहे.
30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा सन्सच्या लिस्टिंगचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात टाटा ट्रस्ट्सच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडत आहेत. सुरुवातीला हे दावे न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्यासमोर आले होते. मात्र, त्यांनी या प्रकरणाच्या सुनावणीतून स्वतःला दूर केले. त्यानंतर न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी 27 नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
Video : सुनेत्रा पवारांना ताकद द्या पण, फडणवीस नको; रोहित पवारांचा थेट इशारा
