गेल्या काही दिवसांपासून अॅड. प्रकाश आंबेडकर (Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी करण्याची चर्चा सुरू होती. अखेर, आज वंचित आणि काँग्रेसने एकत्रित पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, भारिप सोबत आमची आघाडी होती. 1999 नंतर राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नव्हतो. 25 वर्षानंतर आघाडीच्या घोषणेचा मला आनंद आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. काँग्रेस आणि वंचितमध्ये चांगलं नातं आहे, असं म्हणत त्यांनी मुंबईत वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा केली.
मुंबईतील एका आघाडीमुळे वंचित; वरील तो डाग पुसला जाणार; पण भाजपला आयतं कोलीत मिळणार
आमची आघाडी विचाराची आहे. सत्तेसाठी आमची आघाडी नाही. जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. हा संख्येचा खेळ आणि तर हा विचारांचा मेळ आहे. आमची आघाडी विचारांची आहे, सत्तेसाठी नाही. आजपासून आम्ही दोन मित्रपक्ष आहोत. मुंबई महापालिकेत वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार, असं देखील ते म्हणाले.
मुंबई महानगर पालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. तर उर्वरित 165 जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. 25 वर्षांनतर ही युती होत आहे. या युतीला लोक किती प्रतिसाद देतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. कारण, 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधुंही एकत्र आले असून तेही निवडणुकीला सोबत सामोर जात आहेत.
