प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित, 2000 च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

मैत्री आणि महत्त्वाकांक्षेसोबतच जबरदस्त विनोद, कार चेस, थरारक दरोडे आणि गुन्हेगारी जगताची काळी बाजू यांची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

Untitled Design   2026 10 16T143952.640

Untitled Design 2026 10 16T143952.640

Trailer for Prime Video’s ‘Chaar Yaar’ released : एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी हिंदी ओरिजिनल सीरिज ‘चार यार’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. चार मित्रांची कहाणी सांगणारी ही सीरिज एक उत्कंठावर्धक क्राइम ड्रामा आहे. मैत्री आणि महत्त्वाकांक्षेसोबतच जबरदस्त विनोद, वेगवान कार चेस, थरारक दरोडे आणि गुन्हेगारी जगताची काळी बाजू यांची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

या सीरिजमध्ये पूरव झा, नमन जैन, साकिब अयूब आणि प्रयारक मेहता प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत साई ताम्हणकर, सिकंदर खेर, दिव्येंदु भट्टाचार्य, राजेश तैलंग, चंकी पांडे आणि भगवती पेरुमल हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.

आठ भागांच्या या सीरिजचे दिग्दर्शन विनय वैकुल यांनी केले आहे, तर संबित मिश्रा आणि सौरभ सावंत यांनी लेखन केले आहे. पिंक विंडो प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली प्रणती नागरशेठ, नीरज नागरशेठ आणि पी. एस. श्याम यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. बीबीसी स्टुडिओज इंडियाने ही सीरिज विकसित केली आहे. ‘चार यार’ची निर्मिती विनय वैकुल, एस. हुसैन झैदी, संबित मिश्रा आणि सौरभ सावंत यांनी केली आहे.

2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित ही सीरिज प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या आणि गर्दीच्या रस्त्यांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या शहरात जय, टोनी, साहिल आणि समीर हे चार जिवलग मित्र आपल्या मध्यमवर्गीय आयुष्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मोठे करण्याची स्वप्ने पाहतात.

अमेरिका-पाकिस्तान युद्धात भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहणार, भाजप नेत्याचा मोठा दावा

मात्र, एका कठीण प्रसंगात घेतलेला निर्णय त्यांना अशा मार्गावर घेऊन जातो, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे साधेसुधे आयुष्य गुन्हेगारी, गँगस्टर्स आणि मोठ्या चोऱ्यांच्या धोकादायक जगात अडकते. आपली चूक लक्षात येईपर्यंत ते मुंबईच्या अंडरवर्ल्ड डॉन आणि त्यांच्या मागावर असलेले इन्स्पेक्टर सुमित भालेराव यांच्या कचाट्यात सापडलेले असतात.

त्यांच्या योजना एकामागून एक फसत जातात, तसतशा धोकादायक चकमकी आणि वेगवान कार चेसमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढतात. आता जिवंत राहण्यासाठी या चार मित्रांना अशा जगाचा सामना करावा लागणार आहे, जे त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे. या जगात झालेली एक छोटीशी चूकही त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. मात्र, जेव्हा स्वतःचा जीव वाचवणे सर्वांत महत्त्वाचे ठरते आणि प्रत्येक निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागते, तेव्हा हे चार मित्र एकत्र येऊन प्रत्येक संकटाचा सामना करू शकतील का? हाच प्रश्न या सीरिजमधील उत्कंठा वाढवतो.

सीरिजचे निर्माते आणि दिग्दर्शक विनय वैकुल म्हणाले, “‘चार यार’च्या माध्यमातून आम्हाला आयुष्यातील अनिश्चितता आणि त्या अनिश्चिततेचा जवळून अनुभव घेण्यातील थरार दाखवायचा होता. चार मित्रांच्या आयुष्यात अचानक असे काही घडते की, त्यांना काही समजण्यापूर्वीच ते अशा संकटात अडकतात, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते. या संकटातून त्यांना केवळ मैत्रीचे नातेच बाहेर काढू शकते.

अखेर न्याय मिळाला; मालेगावच्या बालिकेवरील अत्याचार-हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशी!

या चार मित्रांची वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे कधी एकमेकांशी भिडतात, तर कधी एकमेकांना साथ देतात. त्यामुळे त्यांचा हा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. चारही प्रमुख कलाकारांसोबतच साई, सिकंदर, दिव्येंदु आणि चंकी यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही शानदार होता. या सर्वांनी आपापल्या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे. या जगाला पडद्यावर साकारताना आम्हाला खूप मजा आली. प्राइम व्हिडिओवर ही सीरिज पाहून प्रेक्षकांनीही या प्रवासाचा अनुभव घ्यावा, यासाठी मी उत्सुक आहे.”

जयची भूमिका साकारणारे प्रयारक मेहता म्हणाले, “जयच्या भूमिकेबद्दल मला सर्वांत जास्त उत्सुकता वाटली, कारण मी यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा तो पूर्णपणे वेगळा आहे. तो कमी बोलणारा, बोलण्यापूर्वी विचार करणारा आणि नेहमी एखादी योजना तयार ठेवणारा माणूस आहे. काही चुकले की त्याचे मित्र त्याच्याकडेच उपायासाठी पाहतात.

मात्र, मला वाटते की आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे क्षण आले आहेत, जेव्हा आपल्याला आपण काय करत आहोत याची पूर्ण खात्री असते; पण नंतर आपली किती मोठी चूक झाली होती, हे लक्षात येते. हीच गोष्ट जयच्या व्यक्तिरेखेला माझ्यासाठी अधिक रंजक बनवते. त्याची समजूतदारपणा ही त्याची सर्वांत मोठी ताकद आहे, पण तीच त्याची कमजोरीही ठरू शकते.

एक अभिनेता म्हणून मला अशा भूमिका आवडतात, ज्या मला आव्हान देतात. जयच्या आयुष्यात इतके मोठे बदल घडतात की, काही वेळा मला जणू तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या भूमिका साकारत असल्यासारखे वाटले. ‘चार यार’बद्दल मी खूप उत्सुक आहे. या सीरिजमधील गुन्हेगारी, अ‍ॅक्शन आणि गोंधळाच्या पलीकडे चार मित्रांची ही कहाणी आहे, जे आपल्या आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटते की अनेक तरुणांना या कथेशी नक्कीच जोडलेपण जाणवेल.”

सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका! SEBI चे निर्बंध लागू, काय परिणाम होणार?

टोनीची भूमिका साकारणारे साकिब अयूब म्हणाले, “‘फर्जी’, ‘बंबई मेरी जान’ आणि ‘अनदेखी’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये मी यापूर्वी बरेच अ‍ॅक्शन सीन्स आणि स्टंट्स केले आहेत. मात्र, ‘चार यार’ची ऊर्जा पूर्णपणे वेगळी होती. वेगवान कार चेस, मोठ्या प्रमाणावरील अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस आणि थरारक प्रसंग यामुळे या सीरिजचा अनुभव खास ठरला.

टोनीची व्यक्तिरेखा समजून घेणे आणि त्याच्या लकबी आत्मसात करणेही तितकेच मजेदार होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, टोनीची भूमिका माझ्यासाठी नेहमीच खास राहील, कारण या भूमिकेमुळे मला मुंबईतील एका सामान्य तरुणाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. यापूर्वी मी प्रामुख्याने वेगळ्या आणि उठावदार व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.

माझ्यातील टोनीला ओळखल्याबद्दल विनय सर आणि मुकेश सर यांचे विशेष आभार. शारीरिक आव्हाने, कार चेस, कधीही न संपणाऱ्या रात्रीच्या शिफ्ट्स आणि सहकलाकारांसोबत घालवलेला वेळ, या सगळ्यामुळे चित्रीकरणाचा अनुभव खूपच छान होता. ही सीरिज बनवताना आम्हाला जितका थरार आणि अनिश्चिततेचा अनुभव आला, तितकाच तो प्रेक्षकांनाही आवडेल, अशी मला आशा आहे.”

साहिलची भूमिका साकारणारे पूरव झा म्हणाले, “अनेक वर्षे कंटेंट क्रिएटर म्हणून काम केल्यानंतर ‘चार यार’ हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, विशेषतः ‘द ट्रेटर्स’नंतर. एक अभिनेता म्हणून ही माझी पहिली मोठी रिलीज आहे आणि मला नेहमीच अशा प्रोजेक्टमध्ये काम करायचे होते. साहिलची भूमिका साकारताना मला एका पूर्णपणे वेगळ्या जगाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. अ‍ॅक्शन ट्रेनिंगनेही मला अनेक नवीन प्रकारे आव्हान दिले. विनय सरांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. तसेच साकिब, नमन आणि प्रयारक यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. प्रेक्षकांनी माझे हे नवे रूप पाहावे आणि साहिलचा प्रवास जाणून घ्यावा, यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

अमेरिका-पाकिस्तान युद्धात भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहणार, भाजप नेत्याचा मोठा दावा

समीरची भूमिका साकारणारे नमन जैन म्हणाले, “समीर हा असा माणूस आहे, जो प्रत्येक गोष्ट बिघडली तरी त्यातही हसण्यासारखे काहीतरी शोधतो. त्याच्या या स्वभावाचा शोध घेण्यात मला खूप मजा आली. तीव्र आणि तणावपूर्ण प्रसंगांनी भरलेल्या या कथेत तो एक वेगळीच ऊर्जा घेऊन येतो. मात्र, सीरिज जसजशी पुढे सरकते, तसतशा त्याच्या स्वतःच्या समस्या आणि व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू समोर येतात.

समीरसारखी व्यक्तिरेखा मिळणे आणि ती साकारणे, या दोन्ही गोष्टी आव्हानात्मक आहेत. या भूमिकेतून मला माझ्या याआधीच्या सर्व भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळे काहीतरी अनुभवता आले. पडद्यामागेही आमच्या चौघांमध्ये एक सहज आणि नैसर्गिक मैत्री निर्माण झाली. आमच्यातील मजेशीर नोकझोकमुळे सेटवरील वेळ आणखी आनंददायी झाला. आम्हा चौघांना एकत्र आणल्याबद्दल मी विनय सरांचा आभारी आहे. प्रेक्षकांनी समीरला भेटावे आणि या मित्रांच्या समूहात तो काय घेऊन येतो, हे पाहावे, यासाठी मी उत्सुक आहे.”

‘चार यार’चा प्रीमियर 23 ऑक्टोबर 2026 रोजी केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे. ही सीरिज भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये हिंदी भाषेत प्रदर्शित केली जाणार आहे.

Exit mobile version