मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही मागण्यांसाठी (Jarange) मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत उपोषणाला पसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 12 दिवस असून सरकारने त्यांच्या 12 मागण्या मान्य केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. मात्र, सरकारने एकही मागणी मान्य केली नसल्याचं सांगत जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकराच्यावतीने मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने मी आणि प्रसाद लाड, आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासन, तथा आरक्षण समितीची बैठक घेतली. आत्तापर्यंत मराठा समाजासाठी जे काही काम केले त्यासाठी या बैठक होत्या. मराठवाड्यात 21 हजार 51 जात प्रमाणपत्र दाखले पडताळणी केली असून त्यातील 16,110 दाखले दिले आहेत. त्यामुळे, पडताळणी चुकीची होतेय हा गैरसमज आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं. तसंच, फक्त 2 हजार दाखले प्रलंबित आहेत, तेही लवकरच मिळतील. त्याचा ओबीसी समाजावर काहीही परिणाम होणार नाही, सरकारची भूमिका स्पष्ट आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
Video : संयमाने घ्या म्हणजे धमकी देता काय?, तुमच्या नरडीचा घोट घेऊ, जरांगे पाटील आक्रमक
आम्ही कुणालाही दुजाभाव वागणूक दिली नाही, सरकार म्हणून आम्ही सोबत आहोत, अधिकारी काम करत आहेत. मनोज दादा खुश राहावे तसे एकनाथ शिंदेही आनंदी राहावे, फडणवीस साहेब ही आनंदी राहावे, मनोज दादाचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळं, ज्या नेत्यांनी काम केलं त्या नेत्यांबद्दल वाईट बोललं तर वाईट वाटतं, असं म्हणत उदय सामंत यांनी जरांगे पाटलांकडून एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख करण्यात आल्यावरुन मत मांडलं. तसंच, जाणीवपूर्वक कुणीतरी त्यांच्यात गैरसमज करतंय, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संवाद गरजेचा आहे, आणि आमच्या नेतृत्वाला वाईट बोलू नये हे आम्ही संयमाने सांगतो. मनोज जरांगे पाटील यांना गैररसमज नाही, त्यांना कुणीतरी सांगतं आणि नंतर होतो असं आम्हाला वाटतं. उद्या पोळा सण आहे, मराठवाड्यात दुष्काळ आहे, राज्यात गणेशोत्सव आहे. त्यामुळं, आंदोलनाला स्थगिती द्यावी ही विनंती आहे, असंही सामंत यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटील आक्रमक आहेत तर आम्ही सरकार आहोत, मायबाप आहोत, संयम आमच्या पाचवीला पुजला आहे. आम्हला संयमीच बोलावं लागेल. आम्ही त्यांना अभ्यासक पाठवा आवाहन केलं, आता ते आले नाही तर काय करावं, असा सवालही सामंत उपस्थित केला आहे.
आम्ही 4 पाऊल नाही 500 किमी पुढं आलोय, दंगल घडवणं हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही, हे पाप आम्ही करणार नाही, ते आमचं काम नाही. मनोज जरांगे यांनी हे डोक्यातून काढून टाकावं, उपोषणामुळं त्यांना चिडचिड होतेय. सरकार काळजी घेतेय तशी आंदोलकांनी ही काळजी घ्यावी. जसं जरांगे याचे समर्थक आहेत, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक आहे ना, ते ही बोलणार ना. आमच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची चिडचिड नाही, भावना आहेत. हे सगळे शिंदे साहेबांमुळे मंत्री झाले आहेत, माझी त्यांना सांगण्याची भाषा मी मराठीचा मंत्री असल्याने सौम्य आहे. मात्र, प्रत्येकाचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे ते त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलू शकतात, असंही सामंत यांनी म्हटलं आहे.
