ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन.

Untitled Design   2026 10 08T075020.652

Untitled Design 2026 10 08T075020.652

Veteran actor Nana Patekar passes away. : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून कला विश्वाने एक अष्टपैलू आणि प्रभावी अभिनेता गमावला आहे. विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक वेगळे व्यक्तिमत्त्व होते.

आपल्या आगळ्यावेगळ्या संवादफेकीने, तीव्र अभिनयशैलीने आणि वास्तववादी भूमिकांनी त्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अभिनेत्यांपर्यंत पोहोचला. नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांतून अभिनयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर 1978  मध्ये प्रदर्शित झालेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीला छोट्या-मोठ्या भूमिका करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

 

मात्र 1988 मधील ‘लाम बॉम्बे! या चित्रपटातील भूमिकेमुळे समीक्षकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. त्यानंतर 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या परिंदा या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण दिले. या चित्रपटातील अण्णा ही व्यक्तिरेखा आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रभावी भूमिकांपैकी एक मानली जाते. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले.

यानंतर क्रांतिवीर, अंगार, अग्नीसाक्षी, तिरंगा, अब तक छप्पन, राजनीती आणि वेलकम यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाची वेगळी छाप पाडली. गंभीर, आक्रमक, भावनिक आणि विनोदी अशा विविध छटांच्या भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या. मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत वास्तवतेची ताकद आणि व्यक्तिरेखेत पूर्णपणे समरस होण्याची क्षमता दिसून येत असे.

ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, दिल्लीत पुन्हा विरोधकांचे आंदोलन; राहुल – प्रियंका पोलिसांच्या ताब्यात

अभिनयासोबतच नाना पाटेकर हे सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जात होते. शेतकरी प्रश्न, दुष्काळग्रस्तांना मदत आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्पष्टवक्तेपणा, साधी राहणी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांना सर्वसामान्यांमध्ये विशेष आदराचे स्थान मिळाले. नाना पाटेकर हे केवळ अभिनेता नव्हते, तर एक विचारवंत कलाकार, समाजाशी नाळ जोडून ठेवणारे व्यक्तिमत्त्व आणि अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान होते. अभिनयातील तीव्रता, संवादातील धार आणि व्यक्तिरेखेला जीवंत करण्याची अद्भुत क्षमता यामुळे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

त्यांच्या निधनाने केवळ एक अभिनेता नाही, तर मनोरंजनविश्वातील एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. मात्र त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिका, संस्मरणीय संवाद आणि प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेली भावनिक नाळ यामुळे नाना पाटेकर कायम स्मरणात राहतील.

Exit mobile version