महाराष्ट्रातील 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायत निवडणुकीचे (Election) सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यामध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून त्यांचा आकडा 200 च्या पार गेला आहे. ही परिस्थिती बीडमध्येही आहे. भाजपने बीडमध्ये स्वबळावर पहिल्यांदच मोठी मुसंडी मारली आहे.
यामध्ये परळीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या पक्षांनी मुंडे बहिण भावाच्या नेतृत्वात युती केली होती. त्याचा त्यांना फायदा झाल्याचं दिसत आहे. येथे त्यांच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्या आहेत. येथे बीडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बंजरंग सोनवणे यांनी जास्त लक्ष घातलं होत. परंतु, मतदारांनी त्यांना विधानसभेनंतर पुन्हा नाकारलं असून मुंडे बहिण भावांच्या नेतृत्वाला पसंती दिली आहे.
अशोक चव्हाणांना धक्का, लोहा नगरपरिषदेत एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव
गेवराईमध्ये विद्यमान आमदार आणि गेली अनेक काळापासून गेवराईच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व असणाऱ्या पंडित कुटुंबाला हा मोठा धक्का माणला जात आहे. येथे भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार आणि पंडित यांच्या घराण्यात राजकीय संघर्ष आहे. तो यावेळी थेट रस्त्यावर पाहायला मिळाला. अभयसिंह पंडित हे आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे आहेत. त्यांनी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांचे बंदू बाळराजे पवार यांच्या पत्नी आणि नगराध्यक्षपद्याच्या उमेदवार गीता बाळराजे पवार यांच्याविषयी काहीती अपशब्द वापरे अस आरोप होता. त्यातून मतदानाच्या दिवशीच पंडित आणि पवार यांच्यात वाद झाला. त्यामध्ये बाळराजे पवार यांना पुढे अटक झाली. त्याच भांडणाचा परिणाम थेट मतदानावर झाल्याचं आजच्या निकालातून दिसलं आहे. स्वत: आमदार विजयसिंह पंडित यांनी हातात घेतलेल्या या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे.
बीडमध्ये गेली 40 वर्षापासून क्षीरसागर घराण्याचे वर्चस्व आहे. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू भारतभुषण हे बीडचे तब्बल 35 वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहेत. सध्या जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण हे दोन्ही बंधू सध्या सक्रीय नाहीत. परंतु, त्यांची पुढची पिढी आता सक्रीय आहे. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत विद्यमान आमदार संदिप क्षीरसागर हे आहेत तर नुकते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले योगेश क्षीरसागर यांच्यात येथे लढत होती. तसंच, गेवराईच्या पंडितांनीही यावेळी बीडमध्ये मोठ लक्ष घातलं होतं. पंडितांनी लक्ष घातल्यामुळेच योगेश यांनी पक्षांतर केलं असंही नंतर समोर आलं होत. दरम्यान, बीडचे आमदार हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे असल्याने तीथे त्यांचाच प्रभाव राहील असं दिसत असताना भाजपने मात्र चांगलीच मुसंडी मारली आहे.
