मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?, न्यायालयाचा पोलिसांना प्रश्न

न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने पोलीस महासंचालक आणि तपास अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले

News Photo   2026 09 09T191603.928

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?, न्यायालयाचा पोलिसांना प्रश्न

पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात खासदार पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे 1800 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहाराशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने पार्थ पवार यांना आरोपी का करण्यात आलं नाही, असा थेट सवाल महाराष्ट्र पोलिसांना केला आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने पोलीस महासंचालक आणि तपास अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले असून, प्रकरणाची पुढील सुनावणी 28 सप्टेंबरला होणार आहे.

Exit mobile version