मोठी बातमी : आरबीआय मोठा धक्का देणार ? गृहकर्ज, वाहन कर्ज महागणार

RBI: या डिसेंबरपर्यंत रेपो दरात एकूण 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकते. त्यामुळे गृहकर्ज, कार लोन वाढणार.

Rbi

Rbi

मुंबई : अमेरिकेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने मोठे आणि कठोर पावले उचलत व्याजदर वाढविले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम थेट भारतावर होऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) अपेक्षेपेक्षा अधिक व्याजदर वाढवू शकते, असा अंदाज विदेशी ब्रोकरेज फर्म नोमुराने ( Nomura) व्यक्त केला आहे.

या डिसेंबरपर्यंत रेपो दरात एकूण 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकते. त्यामुळे गृहकर्ज, कार लोनसह इतर कर्जांच्या व्याजदरावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ब्रोकरेज फर्म नोमुराने म्हटले आहे. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (MPC) बैठक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याचे निर्णय 7 ऑक्टोबरला जाहीर केले जाणार आहेत. गव्हर्नर संजय मल्होत्रा 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पतधोरणाची घोषणा करतील. नोमुराच्या अंदाजानुसार, आगामी पतधोरणात आरबीआयचा व्याजदरांबाबतचा दृष्टिकोन अपेक्षेपेक्षा अधिक आक्रमक असू शकतो. बहुतांश विश्लेषकांच्या मते आरबीआय पुढील वर्षापर्यंत व्याजदरात सुमारे 125 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ करू शकते.


यावर्षी दोनदा रेपो दर वाढण्याचा अंदाज

नोमुराच्या मते, RBI ऑक्टोबरच्या पतधोरणात रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकते. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा 25 बेसिस पॉइंट्सची वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रेपो दर 5.75 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. खाद्यपदार्थ आणि ऊर्जेच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पुढील सहा महिन्यांत महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी RBIकडून व्याजदर वाढवले जाऊ शकतात, असे नोमुराने म्हटले आहे.


‘गोंधळ’ची ऑस्करकडे वाटचाल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढ?
नोमुराच्या मते आरबीआयकडून रेपो दरात होणारी संभाव्य वाढ ही महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने असेल. याकडे व्याजदर वाढीच्या दीर्घकालीन आक्रमक चक्राची सुरुवात म्हणून पाहू नये, असेही ब्रोकरेज फर्मने स्पष्ट केले आहे. नोमुराने FY27 मध्ये सरासरी CPI महागाई 5.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर FY28 मध्ये महागाई आरबीआयच्या 4 टक्क्यांच्या लक्ष्यापर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.


कौटुंबीक वाद पेटला अन् सावत्र मुलानं वडिलांवर झाडली गोळी, पाच जणांविरोधात गुन्हा

कच्चा तेलाच्या किमती वाढल्याने महागाईचा दबाव
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हा महागाई वाढण्यामागील महत्त्वाचा घटक ठरत आहे. अमेरिके-इराण संघर्षानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. जूनमध्ये किमती काही प्रमाणात कमी झाल्या होत्या; मात्र त्यानंतर पुन्हा त्यात वाढ झाली आहे. सध्या ब्रेंट क्रूडची किंमत 106 डॉलर प्रति बॅरलच्या वर असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिके-इराण संघर्षापूर्वी ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 71 डॉलर प्रति बॅरल होती. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम देशातील महागाईवर होत असल्याचे नोमुराने म्हटले आहे.

Exit mobile version