Download App

बारावी, डिप्लोमाधारक अन् पदवीधरांना कसे मिळणार पैसे? जाणून घ्या सविस्तर योजना

stipend Scheme मुख्यमंत्र्यांनी तरूणांसाठी आणलेली योजना नेमकी काय आहे? याचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घेऊ सविस्तर...

12th Pass, Graduates and Diploma holders stipend Scheme : सरकारने राज्यात नुकतीच लाडकी बहीण योजना आणल्यानंतर राज्यातील लाडक्या भावांचं काय? असा प्रश्न विरोधक विचारत होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. (Eknath Shinde ) 12 वी उत्तीर्ण (12th Pass, Graduates) डिप्लोमा केलेले, तसंच, पदवीधर तरुणांना स्टायपंड (stipend Scheme ) देण्यात येणार आहे. यासाठी सरकार तब्बल 5 हजार 500 कोटी खर्च करणार आहे. मात्र ही योजना नेमकी काय आहे? याचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घेऊ सविस्तर…

योजना नेमकी काय आहे?

या योजनेत राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच सरकारकडून या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे. तरुणांना राज्य सरकारकडून या योजनेतंर्गत प्रशिक्षणासोबतच दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतही मिळणार आहे. याच बरोबर प्रशिक्षणादरम्यान 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआय डिप्लोमा धारकाला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे.

या योजनेसाठी पात्रता नेमकी काय?

– 18 ते 35 वर्षांच्या अर्जदारांना या योजनेत अर्ज करता येणार
– अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावेत
– योजनेसाठी बेरोजगार तरूणच पात्र असणार आहेत
– शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, किंवा पदवीधर असावा

तर या योजनेअंतर्गत प्रशिक्षिण देणाऱ्या संस्थांना देखील काही अटी घालून देण्यात आल्या आहे. त्यामध्ये…

– संबंधित संस्था महाराष्ट्रातील असावी
– त्या संस्थेची कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि इनोव्हेशन वेब पोर्टलवर नोंदणी असावी
– ही संस्था तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेली असावी
– संस्थेची ईपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, डीपीआयटी आणि उद्योग आधारकडे नोंदणी असावी
– तसेच या संस्थेकडे आणि कंपनी किंवा संस्था म्हणून नोंदणीचे प्रमाणपत्र असावे

कोण-कोणती कागदपत्र लागणार?

आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, वय प्रमाणपत्र, चालक परवाना, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, बँक खाते पासबुक, ई-मेल आयडी,

कसा करता येणार अर्ज?

या योजनेसाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या https://www.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही या वेबसाईटवर नवीन यूजर्स असेल तर नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.
त्या अर्जात तुम्हाला नाव, पत्ता आणि वयोगट भरावा लागेल.
यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक भरावे लागेल आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागेल.
यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून सबमिट करा.

अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर त्याचा लाभ घेऊ शकता.

follow us