ITBP Recruitment 2024 : 12 वी पास तरूणांसाठी सुवर्णसंधी! थेट इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसमध्ये व्हा भरती

ITBP Recruitment 2024 : 12 वी पास तरूणांसाठी सुवर्णसंधी! थेट इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसमध्ये व्हा भरती

ITBP Recruitment 2024 12th pass candidate can apply : बारावी पास (12th pass ) झालेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आले आहे. ती म्हणजे सध्या इंडो तिबेटियन सीमा पोलीस (ITBP Recruitment) यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यामध्ये विविध पदांसाठी तब्बल 9451 उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

विखेंकडे काम नाही म्हणून कोर्ट कचेऱ्या.. लंकेंचा सुजय विखेंना खोचक टोला

नेमकी कशी आहे भरती प्रक्रिया?

एकूण जागा : 9451
पोलीस निरीक्षक : 321
पोलीस उपनिरीक्षक : 1544
कॉन्स्टेबल जीडी : 4640
हेड कॉन्स्टेबल : 3150

जरांगेंचं आंदोलन राजकीय, पवार-ठाकरेंना आरक्षणाबाबात विचारत नाहीत; फडणवीसांवरील टीकेवरून दरेकरांचा पलटवार

पात्रता : वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित उमेदवाराने देशातील कोणत्याही बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 या दरम्यान असणं आवश्यक आहे.

फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर, इकोसिस्टम तयार होतंय..; फडणवीसांची आरपारची लढाई

तर या पदासाठी नियुक्ती झालेल्या उमेदवाराला 21 हजार 700 ते 69 हजार 100 या दरम्यान वेतन मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार तिसऱ्या स्तरावरील हे वेतन असणार आहे.

या पदासाठी अर्ज करताना खुला प्रवर्ग ओबीसी आणि आर्थिक मागासवर्गीय उमेदवारांना शंभर रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे तर आणि एसटी या उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी नसणार आहे.

निवड प्रक्रिया : वरील सर्व पदांसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड प्रक्रिया ही तीन पायऱ्यांमध्ये असणार आहे ज्यामध्ये…
– शारीरिक मापन चाचणी आणि शारीरिक मानक चाचणी
– लेखी परीक्षा
– कागदपत्र पडताळणी

आता परवानगीची गरज नाही; मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश

तर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे…

– त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इंडो तिबेटियन सीमा पोलीस यांच्या https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
– त्यानंतर आपला ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करा.
– त्यामध्ये तुमची सर्व योग्य माहिती भरा पुढील पर्यावर क्लिक करून तुमचा फोटो आणि सही अपलोड करा
– त्यानंतर अर्जासाठी लागणारे शुल्क भरा
– सबमिट झालेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढा. ही प्रिंट तुम्हाला भविष्यात काम मिळू शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube