जरांगेंचं आंदोलन राजकीय, पवार-ठाकरेंना आरक्षणाबाबात विचारत नाहीत; फडणवीसांवरील टीकेवरून दरेकरांचा पलटवार

जरांगेंचं आंदोलन राजकीय, पवार-ठाकरेंना आरक्षणाबाबात विचारत नाहीत; फडणवीसांवरील टीकेवरून दरेकरांचा पलटवार

Pravin Darekar on Manoj Jarange for criticize Devedndra Fadanvis : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे ( Manoj Jarange) यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीसांवर (Devedndra Fadanvis) खडसून टीका केली होती. त्याला उत्तर देताना भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी जरांगे यांच्या समाचार घेतला आहे. दरेकर म्हणाले की जरांगे यांच्या आंदोलनामध्ये राजकीय वास येत आहे. त्यामुळे राजकीय भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी राजकारणात यावं.

फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर, इकोसिस्टम तयार होतंय..; फडणवीसांची आरपारची लढाई

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, मनोज जरांगे हे खालच्या पातळीवरील भाषा वापरत आहेत. आरक्षणाबाबत त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला देखील विचारावं. मात्र त्यांच्या आंदोलनाला राजकीय वास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून जरांगे हे कुणाला पाडायचं किंवा निवडून आणायचं? याचा प्लॅनिंग करत आहेत. त्यामुळे राजकीय भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी राजकारणात यावं. तसेच जर त्यांनी राजकीय आणि अजेंडा राबवला नाही. तर आम्ही देखील त्यांच्यासोबतच आहोत. असं म्हणत दरेकर यांनी जरांगे यांचा चांगला समाचार घेतला.

आता परवानगीची गरज नाही; मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश

काय म्हणाले मनोज जरांगे?

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आमदारांच्या जीवावर तुम्ही सत्तेत आला आहात, पण मराठा आमदार, मंत्री आमच्या अंगावर घालू नका, तुम्ही मराठा समाज आणि मराठा नेत्यांमध्ये भांडणे लावत आहात. तुम्ही मराठा-मराठांमध्ये मारामाऱ्या लावून मजा बघू नका, मराठे खवळले तर गय करणार नाहीत, या शब्दांत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं होतं.

सगळेचं एका माळेचे मनी…

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पक्षाने पाठ फिरवली, शिवाय विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून राडे झाले, याविषयी विचारले असता जरांगे म्हणाले. आम्ही लहानपणापासून या आमदारांचा राडा पाहत आहोत. हे सगळे एकाच माळेचे मनी आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube