विखेंकडे काम नाही म्हणून कोर्ट कचेऱ्या.. लंकेंचा सुजय विखेंना खोचक टोला

विखेंकडे काम नाही म्हणून कोर्ट कचेऱ्या.. लंकेंचा सुजय विखेंना खोचक टोला

Nilesh Lanke on Sujay Vikhe : नगर लोकसभा मतदारसंघातून निवडून (Ahmednagar Lok Sabha) आलेले उमेदवार निलेश लंकेच्या निवडीला (Nilesh Lanke) आव्हान देणारी याचिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी (Sujay Vikhe) औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. यावर लंके यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. नगरचा विकास कसा होईल याकडे आमचे लक्ष आहे. मात्र विखेंकडे काही कामच उरलेले नाही यामुळे ते कोर्ट कचेऱ्या करत बसले. या कुटुंबाला पराभव मान्यच नाही अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला.

खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महापालिकेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहराच्या पाणीपुरवठाच्या समस्येवर व केंद्र शासनाच्या पाणी योजनेच्या सद्यस्थितीबाबत आयुक्त यशवंत डांगे यांनी माहिती दिली. दरम्यान यावेळी लंके यांनी पुन्हा एकदा विखेंवर निशाणा साधला. यावेळी नगर शहरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजितदादांचं मिशन विधानसभा निलेश लंकेंच्या पारनेरमधून; महिलांशी संवाद साधणार

नगर शहराच्या पाणी योजनेवर अडीचशे कोटी रुपये खर्चूनही नगरकरांना रोज पाणी मिळत नाही. दुसरीकडे शहराच्या हद्दीबाहेर बेकायदेशीरपणे 24 तास पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात थकबाकीपोटी सामान्य नगरकरांचे नळ कनेक्शन तोडले जातात आणि दुसरीकडे विखे फाउंडेशनला तीन कोटी रुपयांची पाणीपट्टी महापालिकेने कशाच्या आधारावर माफ केली? असा सवाल करत हा ठराव महापालिकेच्या आर्थिक हिताच्या विरोधात असल्याने तो शासनाकडे विखंडित करण्यासाठी तात्काळ पाठवावा, असे आदेश खासदार निलेश लंके यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

1991 ची पुनरावृत्ती होणार का?

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. निवडणुकीत लंकेंनी विजयाचा गुलाल उधळला. काही मतदान केंद्रावरील मतमोजणी योग्य पद्धतीने झाल्या नसल्याचा आरोप करत विखे यांनी निवडणूक आयोगाकडे फेर पडताळणीची मागणी केली आहे. दरम्यान 1991 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्व. बाळासाहेब विखे पाटील यांना नगर दक्षिणेमधून पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख विजयी झाले होते.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ चार तीर्थस्थळांचा समावेश

मात्र या निवडणुकीनंतर विखे यांनी गडाख यांच्या निवडीलाच आव्हान दिले होते. यशवंतराव गडाख आणि शरद पवार यांनी भाषणातून आपली बदनामी केली याचाच परिणाम मतांवर झाल्याचा दावा विखे यांनी केला होता. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत सुनावणी होऊन नंतर गडाख यांची निवड रद्द झाली होती. हा खटला देशात गाजला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube