पंतप्रधान मोदींच्या त्या वाक्यातून श्रुती वाकडकरांना कशी मिळाली प्रेरणा?

Pimpri Chinchvad च्या भाजप उमेदवार श्रुती वाकडकर मोदी त्यांचे आदर्श असून त्या कशी प्रेरित झाल्या याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले.

Shruti Wakadkar

Pimpri Chinchvad Ward 25 BJP Candidate Shruti Wakadkar on PM Modi : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने आपली सत्ता आणण्यासाठी कंबर कसलेली आहे. त्यामध्ये पिंपरी चिचवडच्या प्रभाग क्रमांक 25साठी भाजपने श्रुती वाकडकर यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने वाकडकर यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी त्यांचे आदर्श असल्याचं सांगितलं. त्यातून त्या कशी प्रेरित झाल्या याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या त्या वाक्यातून वाकडकरांना प्रेरणा…

यावेळी बोलताना भाजपच्या पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 25 च्या उमेदवार श्रुती वाकडकर या पंतप्रधान मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. त्यांना मोदींच्या सत्तेत आल्यापासूनचा त्यांनी लावलेला कामाचा धडाका फार प्रभाविक करतो. असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच अयोध्येचं राम मंदिर असो किंवा इतर धार्मिक गोष्टींच्या प्रेरणेमुळेचं आपण देखील प्रभागात धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करत असतो.

बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन प्रभाग आठमधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

यामध्ये त्यांनी प्रसिद्ध प्रबोधनकार जया किशोरी यांच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी आपल्या प्रभागामध्ये केलं होतं. त्यामुळे जी नवी पिढी आहे. ती पाश्चात्य विचारांनी भरकटली न जाता त्यांना आपल्या धार्मिक प्रथा परंपरांची माहिती मिळाली. त्यांना त्यातून सद्गुण मिळावेत असं देखील आपला उद्देश्य असल्याचं त्या म्हणाली.

आठवणी लिहलेल्या पुसता येतात पण…, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा अभितनेता रितेशकडून समाचार

दरम्यान पिंपरी चिंचवडमधील बहुचर्चित प्रभाग क्रमांक 25 मधील भाजप प्रचाराचा नारळ आज फुटला, राहुल कलाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पॅनलचा प्रचार पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 25 (वाकड, ताथवडे, पुनावळे) मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पुनावळे गावठाणात झाला. यावेळी प्रभागातील भाजप उमेदवार माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्यासह इतर उमेदवार उपस्थित असतील. पुनावळे गावठाणातून प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर याच भागातून पदयात्राही काढण्यात आली.

follow us