Download App

2025 Bajaj Dominar 400 ‘या’ दिवशी भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या फीचर्स

2025 Bajaj Dominar 400 :  भारतीय बाजारात बजाज लवकरच मोठा धमाका करत आपली नवीन बाईक लॉन्च करणार आहे. माहितीनुसार, पुढील काही दिवसात भारतीय

2025 Bajaj Dominar 400 :  भारतीय बाजारात बजाज लवकरच मोठा धमाका करत आपली नवीन बाईक लॉन्च करणार आहे. माहितीनुसार, पुढील काही दिवसात भारतीय बाजारात बजाज नवीन बाईक बजाज (Bajaj) डोमिनार 400 (2025 Bajaj Dominar 400) करणार आहे. ग्राहकांना या बाईकमध्ये भन्नाट फीचर्ससह जबरदस्त रंग पर्याय देखील मिळणार आहे. माहितीनुसार कंपनीकडून ही बाईक डीलरशिपपर्यंत पोहोचू लागले आहे.

2025 Bajaj Dominar 400 फीचर्स

माहितीनुसार कंपनी या बाईकमध्ये नवीन फीचर्स देणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ही बाईक पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असू शकते, जे NS400Z मध्ये दिसते. नवीन क्लस्टरसोबतच, त्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील दिली जाऊ शकते. तसेच या बाईकमध्ये पेट्रोल टाकीवर टेल-टेल क्लस्टरच्या जागी एक USB चार्जिंग पोर्ट मिळण्याची शक्यता आहे. तसेच बजाज नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नियंत्रित करण्यासाठी स्विचगियर देखील अपडेट करू शकते.

डाव्या स्विचगियरवर एक डी-पॅड आहे जो या क्लस्टरला नियंत्रित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. याचबरोबर 2025 बजाज डोमिनार 400 मध्ये राईड-बाय-वायर आणि एबीएस मोड देखील समाविष्ट केला जाऊ शकतो.

काय बदलणार नाही?

2025 च्या बजाज डोमिनार 400 मध्ये कोणतेही यांत्रिक बदल दिसणार नाहीत. पूर्वीप्रमाणेच, यात 373.3 सीसी सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते, जे 39 बीएचपी पॉवर आणि 35 एनएम टॉर्क जनरेट करेल. त्याचे इंजिन पूर्वीप्रमाणेच 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल. पूर्वीप्रमाणेच, त्यात विंडस्क्रीन, नकल गार्ड्स, मागील सामानाचा रॅक आणि पिलियन बॅकरेस्ट दिसतो. त्याच्या टूरिंग क्षमतेत कोणताही बदल करता येणार नाही.

LetsUpp Exclusive : आय लव्ह माय इंडिया, पर्यटकांसाठी जीव देऊ…, पहलगाम हल्ल्यानंतर टुरिट्स गाईडने मांडली आपली व्यथा

हे एकमेव प्रकार म्हणून ऑफर केले जाऊ शकते ज्यामध्ये स्टॅन्डर म्हणून टूरिंग अॅक्सेसरीज बसवले जातील. सध्याच्या  या बाईकची किंमत एक्स-शोरूम 2.26 लाख रुपये आहे. मात्र अपडेट या बाईकची किंमत वाढणार असल्याची चर्चा सध्या बाजारात होत आहे. मात्र याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

follow us

संबंधित बातम्या