Download App

ग्राहकांना धक्का, iPhone 17 येताच ‘हे’ 4 आयफोन होणार बंद; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

iPhone 17 : ॲप्पल जागतिक बाजारात मोठा धमाका करत पुढील काही दिवसात iPhone 17 लॉन्च करणार आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार

  • Written By: Last Updated:

iPhone 17 : ॲप्पल जागतिक बाजारात मोठा धमाका करत पुढील काही दिवसात iPhone 17 लॉन्च करणार आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, iPhone 17 मध्ये एकापेक्षा एक भन्नाट भन्नाट फीचर्स पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे सध्या आयफोन यूजर्ससाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनूसार, iPhone 17 लॉन्च होताच 4 आयफोन कंपनी बंद करणार आहे.

ॲप्पल दरवर्षी बाजारात सप्टेंबर महिन्यात नवीन आयफोन लॉन्च करत असते. यावेळी देखील कंपनी सप्टेंबर महिन्यात ‘अवे ड्रॉपिंग’ या कार्यक्रमात आयफोन 17 सह आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स लॉन्च करणार आहे. तसेच ॲप्पल वॉच सिरीज 11 आणि अल्ट्रा 3 आणि एअरपॉड्स प्रो देखील लॉन्च होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे कंपनी काही जुने मॉडेल्स बंद करणार आहे. कंपनीने आतापर्यंत नवीन आयफोन लॉन्च केल्यानंतर अनेक फ्लॅगशिप प्रो मॉडेल बंद केले आहे. यावेळी देखील आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्लस बंद होण्याची शक्यता आहे. याचबरोबर कंपनी आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स देखील बंद होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कंपनी काही वॉच देखील बंद करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, कंपनी आयफोन 17 इव्हेंटनंतर अ‍ॅप्पल वॉच सिरीज 10 आणि अ‍ॅप्पल वॉच अल्ट्रा 2 मॉडेल्स देखील बंद करण्याची तयारी करत आहे.

आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लसची किंमत

भारतात आयफोन 15 ची सुरुवातीची किंमत सुमारे 79,900 रुपये (128 जीबी व्हेरयंट) पासून सुरू होते. तर आयफोन 15 प्लसची किंमत सुमारे 89,900 (128 जीबी व्हेरियंट) पासून सुरू होते. आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्सची किंमत भारतात आयफोन 16 प्रोची सुरुवातीची किंमत सुमारे 1,39,900 रुपये (128 GB व्हेरियंट) आहे. तर आयफोन 16 प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत सुमारे 1,59,900 रुपये (256 जीबी व्हेरियंट) आहे.

आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स फीचर्स

आयफोन 16 प्रो मध्ये 6.3-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो ProMotion १२०Hz रिफ्रेश रेट आणि ऑलवेज-ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो. त्यात एक नवीन A18 Pro चिपसेट आहे, जो AI आणि ग्राफिक्ससाठी ऑप्टिमाइझ केलेला आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 48MP वाइड कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि एक नवीन 5x टेलिफोटो लेन्स समाविष्ट आहे.

Commonwealth Games 2030 आयोजनासाठी भारताचा मोठा निर्णय; केंद्र सरकारने दिली मान्यता 

तर आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये 6.9 -इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो प्रोमोशन 120Hz आणि ऑलवेज-ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच यामध्ये  A18 Pro चिपसेट देखील आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 48MP प्राइमरी सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 5x टेलिफोटो लेन्स आहे, जे उत्तम झूम फोटोग्राफीला अनुमती देते.

follow us