भारतात iPhone 17 ची तुफान क्रेझ; लॉन्चिंगपूर्वीच फीचर्स अन् किंमत लीक, जाणून घ्या किंमत

iPhone 17 Price Leak : ॲप्पल 9 सप्टेंबर रोजी आयफोन 17 लॉन्च करणार आहे. त्यामुळे आयफोन 17 मध्ये काय काय फीचर्स मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, भारतीय बाजारात आयफोनसाठी तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारात आयफोन 17 ची किंमत लीक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आयफोन खरेदी करण्याची तयारी ग्राहक करत आहेत.
आयफोनची क्रेझ वाढली
गेल्या काही दिवसात भारतीय बाजारात ॲप्पलची मागणी वाढली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात आयफोनची (iPhone 17) विक्री होत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारतातील स्मार्टफोन बाजारात आयफोनचा वाटा 7% आहे. भारतीय बाजारातून गेल्या वर्षी मार्च 2024 ते मार्च 2025 पर्यंत कंपनीच्या महसुलात 13% वाढ झाली आहे. कंपनीने अलीकडेच तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये नवीन कारखाने सुरू केले आहेत. आयफोन 17 मालिकेचे चारही मॉडेल भारतात बनवले जाणार आहे.
चार फोन होणार लॉन्च
ॲप्पल 9 सप्टेंबर रोजी ‘अवे ड्रॉपिंग‘ या कार्यक्रमात आयफोन 17 सिरीजचे चार मॉडेल लॉन्च करणार आहे. यामध्ये कंपनी आयफोन 17, आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स लाँच करणार आहे. याच बरोबर कंपनी ॲप्पल वॉच आणि अपडेटेड एअरपॉड्स देखील लॉन्च करणार आहे.
आयफोन 17 ची किंमत किती?
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारात आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये, आयफोन 17 एअर 95,000 रुपये आणि आयफोन 17 प्रो मॅक्स 1,64,900 रुपये असू शकते. तर दुसरीकडे जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, आयफोन 17 ची किंमत $799 किंवा सुमारे 67,000 रुपये असू शकते. याचबरोबर आयफोन 17 एअरची किंमत 75,500 ते 79,700 रुपयांच्या दरम्यान असू शकते.
मला सांगायला लाज वाटते पण बीडमध्ये सामाजिक समता आहे का? धनंजय मुंडेंचा सवाल
आयफोन 17 फीचर्स
आयफोन 17 मध्ये कंपनी भन्नाट फीचर्स देण्याची तयारी करत आहे. याच बरोबर या फोनमध्ये कंपनी A19 प्रोसेसर, USB-C पोर्ट, प्रोमोशन सपोर्ट आणि 6.6 इंचाची स्क्रीन देऊ शकते असा दावा लीक झालेल्या अहवालात करण्यात आला आहे.