Download App

7 लाखांची कार, 5 स्टार सेफ्टी अन् डिस्काउंट तब्बल 1,35000 ; ऑफर जाणून व्हाल थक्क

Tata Altroz Discount Offers : भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांपासून टाटा मोटर्सची कार खरेदीसाठी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.

Tata Altroz Discount Offers : भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांपासून टाटा मोटर्सच्या कार खरेदीसाठी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. यातच जर तुम्ही देखील तुमच्यासाठी टाटा मोटर्सची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल कंपनीकडून एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आले आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही कमी किंमतीमध्ये कार खरेदी करु शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने लोकप्रिय हॅचबॅक कार टाटा अल्ट्रोजवर (Tata Altroz) एक जबरदस्त डिस्काउंट ऑफर दिला आहे.

कंपनीने जून महिन्यात टाटा अल्ट्रोजच्या MY 2024 वर डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे. कंपनी या कारवर 1 लाख 35 हजार रुपयांपर्यंतची सुट देत आहे. रोख सवलतीव्यतिरिक्त, या ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस देखील समाविष्ट आहे. या डिस्काउंटच्या आधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या शेजारच्या डिलरशिपशी संपर्क साधून माहिती घेऊ शकतात.

Tata Altroz फीचर्स

भारतीय बाजारात टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टची मागणी गेल्याकाही दिवसात झपाट्याने वाढत चालली आहे. या कारमध्ये कंपनीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट फीचर्स देण्यात आले आहे. या कारच्या केबिनमध्ये क्लिनर डॅशबोर्ड डिझाइनसह रिफ्रेश करण्यात आले आहे. कारच्या केबिनमध्ये 10.25-इंच ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटो एसी कंट्रोल सारखी देखील देण्यात आली आहे. याच बरोबर या कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स, अँबियंट लाइटिंग आणि 360-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स देखील आहेत. कंपनीने अल्ट्रोज फेसलिफ्ट 6.89 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केले आहे जे टॉप मॉडेलमध्ये 11.49 लाख रुपयांपर्यंत जाते.

असाल तुम्ही कमल हसन पण…; तामिळ भाषेच्या मुद्द्यावरून कोर्टानं अभिनेत्याला झाप-झाप झापलं

Tata Altroz इंजिन

टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये कंपनीने पॉवरट्रेन पर्याय दिला आहे. या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन, 1.5-लिटर डिझेल इंजिन आणि सीएनजी पॉवरट्रेनचा पर्याय देण्यात आला आहे. सध्या भारतीय बाजारात ही एकमेव हॅचबॅक कार आहे ज्याला 5 स्टार क्रॅश सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. तर या कारमध्ये सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्ज देखील देण्यात आले आहे.

follow us